शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळ तोडण्याला विरोध ,इंदिरा मातानगरात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:00 IST

गेल्या काही दिवसापासून शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची बंद असलेली मोहीम सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आली. परंतु नासुप्रच्या पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागते. उत्तर नागपुरातील इंदिरा मातानगर येथील अनधिकृ त धार्मिक स्थळ तोडण्याला नागरिकांनी प्रचंड विरोध केला. संतप्त जमावामुळे पथकाला कारवाई थांबवावी लागली.

ठळक मुद्देनासुप्रने उत्तर नागपुरातील तीन धार्मिक स्थळे हटविली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही दिवसापासून शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची बंद असलेली मोहीम सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आली. परंतु नासुप्रच्या पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागते. उत्तर नागपुरातील इंदिरा मातानगर येथील अनधिकृ त धार्मिक स्थळ तोडण्याला नागरिकांनी प्रचंड विरोध केला. संतप्त जमावामुळे पथकाला कारवाई थांबवावी लागली.पथकातील अधिकाऱ्यांनी धार्मिक स्थळाच्या कमिटीच्या सदस्यांसोबत चर्चा केली. धार्मिक स्थळ खूप वर्षापूर्वीचे असून कमिटीकडे आवश्यक कागदपत्रे असल्याने धार्मिक स्थळाला अवैध म्हणता येणार नाही, असा दावा कमिटीच्या सदस्यांनी केला. अखेर पथकाने दोन दिवसाची मुदत देऊ न कारवाई थांबिवली. दोन दिवसात आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची सूचना कमिटीला करण्यात आली. मात्र पथकाने धार्मिक स्थळाच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या चार दुकानांचे अतिक्रमण हटविले.नासुप्रच्या पथकाने उत्तर नागपुरातील पंचवटीनगर, इंदिरा मातानगर व आनंदनगर भागातील तीन अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली. दुपारी १.३० च्या सुमारास पंचवटीनगर येथील अनधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम हटविण्यात आले. त्यानंतर पथक इंदिरा मातानगर येथील बिनाकी झोपडपट्टीतील धार्मिक स्थळ तोडण्यासाठी पोहचले. परंतु धार्मिक स्थळ हटविण्याला नागरिकांनी विरोध केला. ही जमीन नासुप्रच्या स्लम विभागाच्या मालकीची असून येथे धार्मिक स्थळ उभारण्याला नासुप्रने परवानगी दिली नसल्याचा अधिकाऱ्यांना दावा होता. दीड तास नागरिकांनी कारवाईला विरोध केला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत धार्मिक स्थळाच्या जागेबाबतची कागदपत्रे मागितली. परंतु नागरिकांकडे जागेची कागदपत्रे नसल्याने धार्मिक स्थळाचे गेट तोडण्यात आले. रात्री ८वाजेपर्यंत पथकाची कारवाई सुरू होती. धार्मिक स्थळाच्या आजूबाजूला घरांचे बांधकाम केले असल्याने कारवाई पूर्ण झाली नाही. पोलीस बंदोबस्तात पुन्हा कारवाई करणार असल्याची माहिती पथकातील अधिकाऱ्यांनी दिली. ही कारवाई कार्यकारी अभियंता राजेश मेघराजानी, विभागीय अधिकारी (उत्तर) अनिल राठोड, सुधीर राठोड व पथक प्रमुख मनोहर पाटील आदींच्या नेतृत्वात करण्यात आली.चुनाभट्टी येथील धार्मिक स्थळ हटविलेमहापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने धंतोली झोनच्या क्षेत्रातील चुनाभट्टी येथील अनधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम हटविले. दुसऱ्या पथकाने महाल झोन मधील गांधीबाग भागातील गडरलाईनवर उभारण्यात आलेली दोन शौचालये तोडली. सखी तोलानी व रामचंद्र अवथे यांनी हे अवैध बांधकाम केले होते.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणReligious Placesधार्मिक स्थळे