शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कायद्यामुळे होणार नाही गुंतवणूकदारांचे संरक्षण

By admin | Updated: December 9, 2015 03:26 IST

राज्य शासनाने गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी ‘महाराष्ट्र गुंतवणूकदारांचे हितसंबंध संरक्षण कायदा’ लागू केला आहे.

हायकोर्टाचे मत : दिवसेंदिवस वाईट होतेय परिस्थितीनागपूर : राज्य शासनाने गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी ‘महाराष्ट्र गुंतवणूकदारांचे हितसंबंध संरक्षण कायदा’ लागू केला आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद कायद्यात आहे. परंतु, अशाप्रकारच्या कायद्यांमुळे परिस्थितीत बदल झालेला नसून दिवसेंदिवस अधिक वाईट चित्र पहायला मिळत आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी वासनकर प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावरील आदेशात नोंदविले आहे. हा आदेश सोमवारी देण्यात आला.आकर्षक व्याजदराला भुलल्यामुळे गुंतवणूकदारांनी परिश्रमाची कमाई गमावल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. घोटाळेबाज संचालक कारागृहाची हवा खात आहेत. परंतु, घोटाळेबाजांना गजाआड ठेवल्यामुळे गुंतवणूकदारांना कोणताही दिलासा मिळत नाही. उलट त्यांच्या ठेवी धोक्यात येतात. कायदेमंडळ व कार्यकारी अधिकारी हे नागरिकांची गरज ओळखणारे सर्वोत्तम न्यायाधीश आहेत. गुंतवणूकदारांची फसवणूक आजही होत आहे. ते घोटाळेबाजांच्या मायाजाळात अडकत आहेत. यावर तातडीने उपाय शोधण्याची नितांत गरज आहे, असेही न्यायमूर्ती चौधरी यांनी आदेशात नमूद केले आहे. या समस्येवर कशी मात करता येईल, यावर राज्याच्या महाधिवक्त्यांना ११ डिसेंबर रोजी युक्तिवाद करण्यास सांगण्यात आले आहे. शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)