शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बालकांचे संरक्षण वाऱ्यावर

By admin | Updated: June 29, 2015 02:54 IST

बालकांचे अपराधिक प्रकरण दिवसेंदिवस वाढत असताना बालकांना संरक्षण देणारी केंद्र सरकारपुरस्कृत योजना राज्यात लुळी पडली आहे.

बालसंरक्षण कक्षाची दुरवस्था : महिला व बालकल्याण विभागाचे दुर्लक्ष नागपूर : बालकांचे अपराधिक प्रकरण दिवसेंदिवस वाढत असताना बालकांना संरक्षण देणारी केंद्र सरकारपुरस्कृत योजना राज्यात लुळी पडली आहे. या योजनेसाठी कें द्र सरकारकडून उपलब्ध झालेला निधी मंत्रालयस्तरावरील भोंगळ कारभारामुळे उपलब्धच झालेला नसल्याने संपूर्ण राज्यात योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. बालकांच्या हितासाठी राज्य सरकारने २०१२-१३ मध्ये प्रत्येक जिल्ह्यात बालसंरक्षण कक्ष स्थापन केले. महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून बालहिताच्या योजना या कक्षाद्वारे राबविण्यात येणार होत्या. यात बालकांसाठी कार्य करणाऱ्या सर्व विभागाशी समन्वय साधणे, बालकांसाठी असलेल्या योजनांचा लाभ मिळवून देणे, बालकांच्या समस्या सोडविणे, एकात्मिक बालसंरक्षण योजना राबविणे आदी कार्य या कक्षाचे आहे. मात्र लिखित स्वरूपात कामाची कुठलीही स्पष्टता नसल्यामुळे बालसंरक्षण कक्षाचे कर्मचारी अनभिज्ञ आहेत. नियमानुसार प्रत्येक कक्षासाठी १२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात चार ते पाच कर्मचाऱ्यांवरच कक्षाची जबाबदारी आहे. खुद्द महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात या कक्षाचा कारभार केवळ तीन कर्मचाऱ्यांवर आहे. बालन्याय अधिनियमांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी, बालमजुरी थांबविण्यासाठी, भरकटलेल्या बालकांवर संस्कार करण्यासाठी, बालकांवर होत असलेले अन्याय थांबविण्यासाठी, बेपत्ता झालेल्या बालकांची सविस्तर माहिती विविध विभागांना पुरविण्याचे काम बालसंरक्षण कक्षाला करायचे आहे. मात्र या कक्षाला स्वत:चे कार्यालय नाही. कार्यालयात फर्निचर आहे, मात्र तेही तुटलेले. कार्यालयात संगणक नाही, दूरध्वनी नाही. नागपूरच्या कार्यालयाचे काम एका स्वयंपाकखोलीत सुरू आहे. प्रशासनाने या योजनेला उभीच होऊ दिली नाही. महिला व बालकल्याण विभागाने लक्षच दिले नाही. त्यामुळे तीन वर्षांपासून बालसंरक्षण कक्ष मूलभूत सोयींपासून वंचित आहे. (प्रतिनिधी)