शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

वकिली व्यवसायाची महानता प्राणापलिकडे जपा : आशुतोष कुंभकोणी यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 23:20 IST

वकिली हा महान व्यवसाय असून त्याची महानता प्राणापलिकडे जपा, असे आवाहन राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केले.

ठळक मुद्देनवनिर्वाचित बार कौन्सिल सदस्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वकिली हा महान व्यवसाय असून त्याची महानता प्राणापलिकडे जपा, असे आवाहन राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केले.बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोव्याच्या सदस्यपदी निवडून आलेले अ‍ॅड. अनिल गोवारदीपे व अ‍ॅड. पारिजात पांडे यांचा अधिवक्ता परिषदेच्या नागपूर जिल्हा शाखेतर्फे शनिवारी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अन्य प्रमुख अतिथींमध्ये अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल उल्हास औरंगाबादकर, वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी, वरिष्ठ अधिवक्ता अविनाश गुप्ता, वरिष्ठ अधिवक्ता आनंद जयस्वाल, हायकोर्ट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण पाटील यांचा समावेश होता. कार्यक्रम धरमपेठेतील वनामती सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. तिसरे सत्कारमूर्ती अ‍ॅड. असिफ कुरेशी हे वैयक्तिक कारणामुळे कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही.वकिली व्यवसायात यश मिळविण्यासाठी केवळ कष्ट घेण्याची तयारी व प्रामाणिकपणा हवा असतो. या व्यवसायात यशाचा शॉर्टकट नाही असे कुंभकोणी यांनी पुढे बोलताना सांगितले.सामान्य व्यक्तींना न्याय व्यवस्थेकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी कार्य करणे आवश्यक आहे. सध्या सुमारे ६० टक्के पीडित विविध कारणांनी न्यायालयापर्यंत पोहचत नाहीत हा चिंताजनक विषय आहे. बार कौन्सिल वकिली व्यवसायाच्या विकासाकरिता सतत प्रयत्न करीत असते. याशिवाय अन्य समस्या सोडविण्यासाठीही कौन्सिल पुढाकार घेत असते असे अनिल सिंग यांनी सांगितले.नवनिर्वाचित सदस्यांनी वकिलांच्या हितासाठी शक्य होईल त्या सर्व गोष्टी कराव्यात असे आवाहन धर्माधिकारी व गुप्ता यांनी केले. निवडणुकीपूर्वी दिलेली सर्व वचने पूर्ण करण्याची ग्वाही सत्कारमूर्तींनी दिली. जिल्हा शाखेच्या अध्यक्षा अ‍ॅड. पल्लवी खरे, सचिव अ‍ॅड. दीपक गादेवार, अ‍ॅड. गणेश खानझोडे, अ‍ॅड. हर्षवर्धन धुमाळे, अ‍ॅड. ऋषिकेश मराठे, अ‍ॅड. मृणाल नाईक, अ‍ॅड. संगीता जाचक, अ‍ॅड. चंदू लहाबर, अ‍ॅड. कीर्तीकुमार कडू, अ‍ॅड. नीलेश गायधने, अ‍ॅड. ऋषिकेश ढाले आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :advocateवकिलnagpurनागपूर