शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

गडकरींच्या मेव्हण्याकडे घरफोडी

By admin | Updated: April 18, 2015 02:26 IST

डॉलरसह २३ लाखांचा ऐवज लंपास : सीपींना गुन्हेगारांची पहिली सलामी

नागपूर : उपराजधानीत गुन्हेगार मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले आहेत. दिवसाढवळ्या लुटमार, घरफोड्या आणि खुनाच्या घटना घडून नागपूरकर भयग्रस्त झाले असतानाच पुन्हा शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मेव्हण्याकडे चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. चोरट्यांनी डॉलर आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांसह २३ लाखांचा ऐवज चोरून नेला. पोलीस आयुक्त म्हणून उपराजधानीत फोफावलेल्या गुन्हेगारीला लगाम घालण्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी दाखल झालेल्या शारदा प्रसाद यादव यांना पहिल्याच दिवशी गुन्हेगारांनी अशी धाडसी सलामी दिली. गडकरी यांचे मेव्हणे किशोर कमलाकर तोतडे (वय ५५) यांची सोलर सिस्टीम प्रा. लि. आहे. ते खामल्याच्या पांडे लेआऊटमधील रघुकूल अपार्टमेंटमध्ये पहिल्या माळ्यावर राहतात. कंपनीच्या कामाच्या निमित्ताने ते १४ एप्रिलला कोलकाता येथे गेले होते. शुक्रवारी परत येणार म्हणून त्यांची पत्नी मनिषा तसेच मुलगा शंतनू त्यांना घ्यायला आपल्या कारने दुपारी १.३० वाजता घरून रेल्वेस्थानकाकडे निघाले. २५ मिनिटांनी ते घरी पोहचले. बघतात, तो त्यांच्या सदनिकेच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमधील साहित्य अस्तव्यस्त केले होते. सदनिकेतील १ हजार डॉलर, २ किलो चांदी तसेच लक्ष्मीहार, सोनसाखळ्या, चपलाकंठी, अंगठ्या आणि इतर असे ८१० ग्राम सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले. या धाडसी घरफोडीमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली. थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच या घटनेची माहिती देण्यात आली.सर्वत्र खळबळनवीन पोलीस आयुक्त एस. पी. यादव पदभार स्वीकारण्यासाठी येणार असल्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा त्यांच्या स्वागतासाठी अलर्ट होती.अशात चोरट्यांनी ही धाडसी घरफोडी करून नव्या आयुक्तांना ‘कडक सॅल्युट‘ ठोकला. त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली. प्रतापनगर ठाण्याचे एपीआय मारुती मुंडे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त दीपाली मासिरकर, उपायुक्त निर्मलादेवी एस यांच्यासह मोठा ताफा घटनास्थळी पोहचला. श्वान आणि ठसे तज्ज्ञांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. परिसरात नाकाबंदीही करण्यात आली. मात्र, चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाही.२० मिनिटात साधला डावपोलिसांच्या माहितीनुसार, मनिषा आणि शंतनू हे मायलेक घरून १.३० वाजता रेल्वेस्थानकाकडे गेले. १.५३ ला ते घरी परत आले. त्यांना घराचा परिसर सोडण्यासाठी ३ मिनिटांचा वेळ लागला असेल. अर्थात परत ते फक्त २० मिनिटे घराबाहेर होते. अवघ्या २० मिनिटात २२.८० लाखांचा ऐवज लंपास केला.