शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बस पासेससाठी काऊंटर सुरू करण्याचा प्रस्ताव कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:27 IST

‘आपली बस’ प्रकल्पांतर्गत महापालिका शहर बससेवा चालविते. यामुळे वर्षाला ५२.४७ कोटींचा तोटा होतो. आवश्यक सेवा म्हणून आर्थिक परिस्थिती बिकट असूनही हा तोटा सहन करावा लागतो. तोटा कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गाजावाजा करून यासंदर्भात निर्णय घेतल्याचा दावा परिवहन समिती व विभागाकडून केला जातो. यातूनच उत्पन्न वाढीसोबतच विद्यार्थ्यांना सुविधा व्हावी, या हेतूने पासेस देण्यासाठी शाळा-महाविद्यालयात काऊं टर (कक्ष) सुरू करण्याची घोषणा परिवहन समितीने केली होती. प्रत्यक्षात या निर्णयाची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही.

ठळक मुद्देनागपूर मनपाचे कसे वाढणार उत्पन्न : घोषणा झाली पण विद्यार्थ्यांना सुविधा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आपली बस’ प्रकल्पांतर्गत महापालिका शहर बससेवा चालविते. यामुळे वर्षाला ५२.४७ कोटींचा तोटा होतो. आवश्यक सेवा म्हणून आर्थिक परिस्थिती बिकट असूनही हा तोटा सहन करावा लागतो. तोटा कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गाजावाजा करून यासंदर्भात निर्णय घेतल्याचा दावा परिवहन समिती व विभागाकडून केला जातो. यातूनच उत्पन्न वाढीसोबतच विद्यार्थ्यांना सुविधा व्हावी, या हेतूने पासेस देण्यासाठी शाळा-महाविद्यालयात काऊं टर (कक्ष) सुरू करण्याची घोषणा परिवहन समितीने केली होती. प्रत्यक्षात या निर्णयाची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही.शहरातील कोणत्या मार्गावर किती महाविद्यालये आहेत, विद्यार्थ्यांची संख्या व या मार्गावर धावणाऱ्या शहर बस, बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, खासगी वा अन्य वाहनांना वापर करणारे विद्याथीं याचा सर्वे करण्याचा निर्णय परिवहन समितीने घेतला होता. सोबतच विद्यार्थ्यांच्या पालकांची यादी संकलित करून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा मानस व्यक्त करण्यात आला होता. शाळा -महाविद्यालये सुरू झालीत. परंतु अद्याप काऊंटर सुरू करण्यात आलेले नाहीत.महापालिकेच्या परिवहन विभागाला ५ डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१८पर्यंत ५५ कोटी ६२ लाख १५ हजार ८९५ एवढे उत्पन्न झाले. त्या तुलनेत महापालिकेने रेड बसच्या तीन आॅपरेटर्सला १०८ कोटी ९ लाख ६७ हजार ५२५ रुपये एवढी रक्कम दिली. या काळात ५२ कोटी ४७ लाख ५१ हजार ६३० रुपयांचा तोटा झाला. वाढता तोटा कमी करण्यासाठी २० टक्के भाढेवाढीचा प्रस्ताव २ जुलैला होणाऱ्या  परिवहन विभागाने सर्वसाधरण सभेत मंजुरीसाठी ठेवला आहे.ग्रीन बसमध्ये पासची सुविधा द्यावीग्रीन बसचे भाडे अधिक असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही. प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी ग्रीन बसच्या भाड्यात दोन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय परिवहन समितीने घेतला होता. परंतु त्यानतंरही ग्रीन बसच्या उत्पन्नात फारशी वाढ झालेली नाही. अजूनही याा बसेस खाली धावतात. बसेस खाली सोडण्याऐवजी या बसमधून प्रवास करण्यासाठी विद्यार्थ्यांना पास सुविधा देऊ न बसेसची व्यवस्था केली तर काही प्रमाणात का होईना उत्पन्नात वाढ होईल, असे मत समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले. पासेससाठी काऊं टर सुरूनियोजन नसल्याने तोटा वाढलाउत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा परिवहन समितीचे पदाधिकारी व अधिकारी करीत असले तरी त्यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही. समितीतही अंतर्गत वाद व गटबाजी आहे. यामुळे ग्रीन बससोबतच अनेक रेड बस खाली धावत असल्याने तोटा वाढत आहे.डेपोत बसेस खाली परततातरात्रीच्या सुमारास बसस्थानकावरून सुटलेल्या बसेस अखेरच्या थांब्यावरून रात्री डेपोत परत येतात. या बसेस खाली असतात. यामुळे डिझेलचा खर्च वाढतो. याच बसेस अखेरच्या स्थानकावरून सकाळी सुटल्यास डिझेलच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. परंतु याकडे विभागाचे लक्ष नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक