शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सर रुग्णांकडून शुल्क न आकारण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:53 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पूर्वी कर्करोग (कॅन्सर), क्षयरोग, एचआयव्हीबाधित व सिकलसेलच्या रुग्णांकडून शुल्क आकारले जात नव्हते, परंतु जानेवारी महिन्यापासून शुल्काचे नवे दर लागू झाल्याने व यात कॅन्सरच्या रुग्णाकडून शुल्क आकारण्याच्या सूचना असल्याने रुग्ण अडचणीत आले.

ठळक मुद्देमेडिकलचा पुढाकार : नव्या शुल्क दरामुळे रुग्ण अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पूर्वी कर्करोग (कॅन्सर), क्षयरोग, एचआयव्हीबाधित व सिकलसेलच्या रुग्णांकडून शुल्क आकारले जात नव्हते, परंतु जानेवारी महिन्यापासून शुल्काचे नवे दर लागू झाल्याने व यात कॅन्सरच्या रुग्णाकडून शुल्क आकारण्याच्या सूचना असल्याने रुग्ण अडचणीत आले. मेडिकल प्रशासनाने यात पुढाकार घेऊन कॅन्सरच्या रुग्णाकडून शुल्क आकारु नये, असा प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.गरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या मेडिकलच्या विविध शुल्कात जानेवारी २०१८ पासून २५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. नोंदणी शुल्क १० रुपयांवरून २० रुपये करण्यात आले. विविध चाचण्यासह, शस्त्रक्रिया, प्रसुती, वॉर्ड, अतिदक्षता विभागाच्या शुल्कात वाढ करण्यात आली. या शुल्काला घेऊन गरीब रुग्णांकडून संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, विविध शुल्कातून काही गंभीर आजाराच्या रुग्णांना सूट देण्यात आली होती. यात कर्करोगाचा समावेश होता. परंतु नव्या दरपत्रकात त्यांचाही समावेश करण्यात आला. यामुळे रेडिओथेरपी, केमोथेरपी घेणाºया रुग्णांना पैसे मोजावे लागत आहे. मेडिकलच्या कर्करोग विभागात रोज १५० वर रुग्ण येतात. यातील ८० ते ९० रुग्णांवर रेडिओथेरपी तर ६० ते ७० रुग्णांवर केमोथेरपी केली जाते. परंतु बहुसंख्य रुग्ण हे गरीब व कॅन्सरच्या नावाने धास्तावले असतात. काही रुग्णांकडे नोंदणी करण्याएवढेही पैसे नसतात. अशावेळी हे रुग्ण पुढील उपचारापासून दूर राहतात. त्यांचा आजार बळावण्याची शक्यता असते. शुल्काला घेऊन रुग्णांच्या तक्रारीही वाढल्या. अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी याला गंभीरतेने घेतले आहे. त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला मेडिकलच्या विविध शुल्कातून कर्करोगाच्या रुग्णांना वगळण्याचा प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावावर वैद्यकीय शिक्षण विभाग काय उत्तर देतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयcancerकर्करोग