शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

गोळी झाडून जेसीबी चालकाला ठार मारणाऱ्या प्रॉपर्टी डिलरला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:35 IST

जमिनीच्या वादातून बंदुकीची गोळी झाडून जेसीबी चालकाचा खून करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देनागपूर सत्र न्यायालयाचा निर्णय : आठ वर्षांपूर्वी जमिनीच्या वादातून घडला होता थरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जमिनीच्या वादातून बंदुकीची गोळी झाडून जेसीबी चालकाचा खून करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांनी हा निर्णय दिला.प्रवीण भास्कर बोरकुटे (४९) असे आरोपीचे नाव असून, तो लक्ष्मीनगर येथील रहिवासी आहे. त्याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेप व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास तर, ठार मारण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्यामध्ये ३ वर्षे कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. त्याला ७ डिसेंबर २०११ रोजी अटक करण्यात आली होती.ही घटना ७ डिसेंबर २०११ रोजी अजनी पोलिसांच्या हद्दीत घडली होती. गोकुलपेठ येथील फिर्यादी सुधांशु डेग्वेकर यांनी आरोपीच्या मोठ्या भावासोबत बोरकुटे ले-आऊट येथील जमीन खरेदीचा करार केला होता. या जमिनीचे लेव्हलिंग सुरू असताना आरोपी तेथे गेला व त्या जमिनीवर मालकी हक्क सांगितला. तसेच, जमिनीवर बांधकाम केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, त्याने जेसीबी चालक रामलाल धुर्वे (३५) याच्या दिशेने बंदुकीची गोळी झाडली. ती गोळी कपाळावर लागल्यामुळे धुर्वे जागेवरच ठार झाला. तो विणकर कॉलनी, मानेवाडा येथील रहिवासी होता. फिर्यादीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला. पोलीस निरीक्षक आर. एम. काटोले यांनी प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. जयंत अलोणी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Life Imprisonmentजन्मठेपDistrict Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालय