शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

प्रॉपर्टी डीलरच्या घरावर हल्ला

By admin | Updated: December 26, 2016 02:28 IST

कोट्यवधीच्या मालमत्तेच्या सौद्यातून वाद निर्माण झाल्यानंतर एका प्रॉपर्टी डीलरच्या घरावर चौघांनी हल्ला केला.

तोडफोड, मारहाण : २० लाखांची खंडणी मागितली नागपूर : कोट्यवधीच्या मालमत्तेच्या सौद्यातून वाद निर्माण झाल्यानंतर एका प्रॉपर्टी डीलरच्या घरावर चौघांनी हल्ला केला. त्याला मारहाण करून आरोपींनी त्याच्या वाहनाची तोडफोड केली आणि २० लाखांची खंडणी मागितली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी पहाटे २.४५ ते ३ च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. विकेश कैलास जोशी (वय २७) असे तक्रारकर्त्या प्रॉपर्टी डीलरचे नाव आहे. ते रामनगरजवळच्या मरारटोलीत राहतात. इतवारीत त्यांचे कार्यालय आहे. या भागातील एका कोट्यवधीच्या मालमत्तेचा सौदा करण्यात जोशी यांची महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले जाते. त्या वादग्रस्त मालमत्तेच्या सौद्याशी आरोपीही जुळले आहेत. आर्थिक व्यवहाराच्या हालचाली वाढल्याचे कळाल्याने आरोपी आशिष पारधी, हिमांशू पारधी आणि त्यांच्या साथीदारांचा जोशीसोबत वाद सुरू झाला. या पार्श्वभूमीवर रविवारी पहाटे २.४५ च्या सुमारास आशिष, हिमांशू आणि त्यांचे दोन साथीदार जोशीच्या घरावर चालून आले. घरातील साहित्य तसेच वाहनाची तोडफोड करीत जोशी यांना हातबुक्कीने मारहाण केली. ‘त्या’ मालमत्तेत हस्तक्षेप करायचा नाही, असा धाक दाखवून आरोपींनी जोशीला धमकी दिली आणि २० लाखांची खंडणी मागितली. जोशी यांनी रविवारी सकाळी अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. (प्रतिनिधी)