शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

ओळखीचे पुरावे, तरीही मृतदेह बेवारस !

By admin | Updated: July 11, 2015 02:57 IST

संदिग्ध अवस्थेत सापडलेल्या एका तरुणाच्या मृतदेहाची ओळख न पटविताच तो बेवारस समजून पुरण्यात आला. अजनी पोलिसांनी केलेला हा निष्काळजीपणा...

नागपूर : संदिग्ध अवस्थेत सापडलेल्या एका तरुणाच्या मृतदेहाची ओळख न पटविताच तो बेवारस समजून पुरण्यात आला. अजनी पोलिसांनी केलेला हा निष्काळजीपणा गुरुवारी उघडकीस आला.या घटनेमुळे मृत तरुणाचे कुटुंबीय प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत. स्वत:ची चूक लक्षात येताच अजनी पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. राहुल देवेश खंडागळे (२५) रा. हावरापेठ असे पुरण्यात आलेल्या मृताचे नाव आहे. त्याच्या कुटुंबात आई-वडील भाऊ सुरेंद्र आणि मिलिंद आहेत. वडील छिंदवाडा येथील गावात राहतात. दोघेही भाऊ वाहन चालक आहेत तर आई मोलकरीण आहे. राहुल नेहमी बाहेरगावी टूरवर राहत असल्याने त्याचे घरी येणे-जाणे कमीच होते. ११ जून रोजी रात्री राहुल घरी आला. काही वेळ थांबला आणि नवीन कपडे घालून रात्री १०.३० वाजता रवाना झाला. त्याने मोठा भाऊ सुरेंद्र याला सांगितले होते की, तो टूरवर जात आहे. राहुलजवळ मोबाईल होता. परंतु सिम कार्ड नसल्याने सुरेंद्रने त्याला सिमकार्ड विकत घेऊन फोन करण्यास सांगितले. राहुल घरून निघाला आणि शताब्दीनगर चौकातील आॅटो स्टॅँडवर गेला. सुरेंद्रने त्याला जाताना पाहिले. यानंतर रात्री ११.५० वाजता मेडिकलच्या सुरक्षा रक्षकांनी अजनी पोलिसांना रुग्णालयाच्या दुसऱ्या माळ्यावरील वॉर्ड क्रमांक ३४ च्या समोरील भिंतीवरून पडून एक तरुण जखमी झाल्याची सूचना दिली. तो तरुण राहुलच होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला आकस्मिक विभागात भरती केले. तिचे त्याचा मृत्यू झाला. अजनी पोलिसांना राहुलच्या खिशात ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम कार्ड आणि मोबाईल सापडला. परंतु अजनी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना शोधण्यास गंभीरता दाखविली नाही. पोलिसांनी बेवारस मृतदेहाला तीन दिवस ठेवण्याची आवश्यकता तेवढी पूर्ण केली. त्यानंतर गंगाबाई घाटावर नेऊन मृतदेह पुरला. यादरम्यान राहुल टूरवर असल्याचे समजून त्याच्या कुटुंबीयांनी फारसे लक्ष दिले नाही. बेवारस मृतदेहाच्या कुटुंबीयांना एक महिन्यानंतरही शोधता आले नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अजनी पोलिसांना फटकारले तेव्हा कुठे अजनी पोलीस कामाला लागले. ७ जुलै रोजी राहुलच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या आधारावर पोलीस द्वारकापुरी येथे पोहोचले. तेथील एका पानटपरी चालकाने राहुलची ओळख पटविली आणि तो हावरापेठ येथे राहत असल्याचे सांगितले. यानंतर पोलीस त्याच्या घरी पोहोचले. पोलिसांनी जेव्हा राहुल महिनाभरापूर्वीच मरण पावला असून त्याला दफन करण्यात आल्याचे सांगितले तेव्हा कुटुंबीयांना धक्काच बसला. या घटनेमुळे अजनी पोलिसांचा निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. यासंदर्भात अजनी पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांनी राहुलचा मृतदेह आढळल्यावर त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या पत्त्यावर जाऊन विचारपूस केली होती. परंतु तेव्हा कुणीही माहिती दिली नाही. एटीएम कार्डाच्या आधारे शोध घेतला तर तो मध्यप्रदेशातील असल्याचे आढळून आले. सिमकार्ड नसल्याने राहुलचा मोबाईल काम करीत नव्हता. परंतु द्वारकापुरी येथील नागरिकांनी मात्र अजनी पोलिसांच्या दाव्याला खोटे ठरविले आहे. अजनी पोलीस कुठल्याही मृतदेहाबाबत विचारपूस करण्यास आले नव्हते, असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. ७ जुलै रोजी पहिल्यांदाच पोलीस विचारपूस करण्यास आले. राहुलचे कुटुंबीय अनेक वर्षांपासून येथे राहतात. त्यांना बहुतेक लोकं ओळखतात. अशा परिस्थितीत पोलिसांनी अगोदरच विचारपूस केली असती तर १२ जून रोजीच त्याची ओळख पटली असती. (प्रतिनिधी)