शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

प्रॉमिस डे : दिल्या-घेतल्या वचनांची शपथ मोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 10:22 IST

आजच्या प्रॉमिस डेला कुणाला वचन द्या अन् ते प्राणपणाने पाळा. तुम्ही दिलेले हे वचन कुणीतरी तुमच्यावर टाकलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे, हे विसरू नका.

ठळक मुद्देवचन द्या आणि प्राणपणाने पाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वचन देणे खूप सोपे आहे; कारण ते देताना केवळ शब्दांचे भांडवलच हवे असते. परंतु खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा ते वचन पाळायची वेळ येते. अशा वळणावर शब्दांचे क्षणिक बुडबुडे टिकत नाहीत. दुभंगू पाहणाऱ्या नात्याला प्रत्यक्ष कृतीच एकसंध ठेवू शकते आणि या कृतीसाठी प्रसंगी सारे मृगजळी मोह नाकारावे लागतात. ते नाकारण्याइतके तुमचे मन मोठे असेल तरच आजच्या प्रॉमिस डेला कुणाला वचन द्या अन् ते प्राणपणाने पाळा. तुम्ही दिलेले हे वचन कुणीतरी तुमच्यावर टाकलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे, हे विसरू नका. दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे... मनातल्या मोरपीसाची शपथ तुला आहे... हे गाणे गुणगुणण्याचा हा दिवस आहे. ‘व्हॅलेंटाईन्स वीक’मधील पाचवा दिवस हा ‘प्रॉमिस डे’म्हणून का साजरा केला जातो माहितेय? कारण, गुलाब, चॉकलेट, टेडी या नश्वर वस्तू आहेत. प्रेमाची भेट म्हणून त्या घरात सजवता येतील; पण मनात सजवायला जीवलगाचे आश्वस्त करणारे वचनच हवे असते. या दिवशी कपल्स एकमेकांना कोणत्याही परिस्थितीत साथ देण्याचे वचन देतात. एकमेकांसाठी स्वत:मध्ये बदल करण्यास तयार होतात. इतकेच कशाला या दिवशी जोडीदाराला न आवडणाऱ्या सवयीचा अनेक जण त्यागही करतात. त्याग ही गोष्ट कधीही सुखावणारी नसते; परंतु ती आवडत्या व्यक्तीसाठी असेल तर त्यागातही अपार आनंद अनुभवता येऊ शकतो. अर्थात अशा त्यागासाठी जोडीदाराने बळजबरी मात्र करू नये. विचार पटत नसतील तर खुशाल वेगळी वाट धरावी. वचनावरचा विश्वास ढळू देऊ नये; कारण हा विश्वासच नात्यांच्या धमण्यांमध्ये प्राणवायू पेरत असतो. हे पटत असेल तर हा दिवस तुमची प्रतीक्षा करतोय.

द्या वचन आयुष्यभर साथ निभावण्याचेद्या वचन विश्वासाशी दगा न करण्याचेद्या वचन भावना अन् सन्मान जपण्याचेद्या वचन संकटात सुरक्षा पुरविण्याचेद्या वचन देहावर नव्हे मनावर प्रेम करण्याचे

टॅग्स :Valentine Weekव्हॅलेंटाईन वीक