शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील मुख्य बस स्थानकाला बसपोर्ट बनविण्याचा प्रकल्प रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 10:02 IST

Nagpur News उपराजधानी नागपुरातील बस स्थानकाला नवे रूप मिळून बसपोर्ट बनविले जाणार होते. त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे. मात्र मागील दोन वर्षापासून काम थंड बस्त्यात आहे.

ठळक मुद्देअर्धवट कामामुळे खर्चात मात्र वाढशेडही झाले नाही

वसीम कुरेशी

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: उपराजधानी नागपुरातील बस स्थानकाला नवे रूप मिळून बसपोर्ट बनविले जाणार होते. त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे. मात्र मागील दोन वर्षापासून काम थंड बस्त्यात आहे. आतापर्यंत जेमतेम २५ टक्केच काम पूर्ण झाले असले तरी अपूर्ण कामामुळे खर्चात मात्र वाढ झाली आहे.येथील गणेशपेमधील बसस्थानकच्या डाव्या बाजूला पाईपपासून बनविलेल्या शेडचा ढाचा उभारून ठेवला आहे. त्यावर अद्यापही शेड लावलेले नाही. या बस स्थानकाच्या आधुनिकीकरणाच्या कामाला २०१८ मध्ये प्रारंभ झाला होता. प्रवाश्याची वाढती संख्या, गर्दी लक्षात घेऊन नव्याने १० आधुनक प्लॅटफार्म उभारले जाणार होते. यात पार्सल रूम, नवी स्वच्छतागृहे, रेस्टॉरेंट आदींचा समावेश होता. हा प्रकल्प जवळपास १० कोटी रुपयांचा होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराला बिलाची रक्कम न मिळाल्याने काम खोळंबले आहे. दीड महिन्यांपूर्वी कंत्राटदाराला काही रक्कम बरीच विलंबाने मिळाली होती. काही कामे केली असली तरी प्लॅटफार्मसारखे काम या रकमेतून करता आले नाही. राज्याच्या उपराजधानीमधील या बसस्थानकावरील खड्डेही अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत. डेपो कार्यालयाच्या भिंतीला जागोजागी भगदाड पडले आहेत.

एकंदर, आधुनिक होण्याएवजी हे बसस्थान पुन्हा कमजोर बनत चालले आहे. अपुऱ्या स्वच्छतेमुळे प्रवाश्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.. शेड कमी असल्याने पावसात भिजण्याची वेळ प्रवाश्यांवर आली

आहे.

टॅग्स :Governmentसरकार