शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांनी रेशीम उद्योगाकडे वळावे

By admin | Updated: August 27, 2014 00:56 IST

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून रेशीम उद्योगाचा पर्याय तपासून पाहावा, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे आयोजित कार्यशाळेत करण्यात आले.

गोसेखुर्द : कार्यशाळेतून दिली अधिकाऱ्यांनी माहितीनागपूर : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून रेशीम उद्योगाचा पर्याय तपासून पाहावा, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे आयोजित कार्यशाळेत करण्यात आले.कार्यशाळेत वनबलप्रमुख अनिलकुमार सक्सेना, विभागीय आयुक्त अनुपकुमार, अतिरिक्त आयुक्त (आदिवासी) पल्लवी दराडे, भंडाऱ्याच्या जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे, केंद्रीय रेशीम मंडळाचे माजी संचालक डॉ. एस.एच.एम. काद्री, डॉ. दीपक बारसागडे आदींनी शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाबाबत माहिती दिली.देशात मागणीच्या तुलनेत रेशीम उत्पादन कमी असल्याने त्याला बाजारभाव अधिक आहे. शेतकऱ्यांनी तुती लागवड करून रेशीम उत्पादनात वाढ करावी. शासनाच्या रेशीम उद्योग संचालनालय आणि वस्त्रोद्योग खात्यामार्फत यासाठी विविध योजना राबविल्या जातात; त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे यावेळी सांगण्यात आले.पूर्व विभागातील चार जिल्ह्यांत रेशीम विभागाचे ११०० हेक्टर तर वन विभागाच्या १७,००० हजार हेक्टर वनक्षेत्रावर टसर कीटक संगोपन केले जाते. एक हेक्टरमध्ये एका वर्षात तीनवेळा नियोजनबद्ध पद्धतीने शेती केल्यास ६० ते ७० हजार रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांना होऊ शकते. भंडारा जिल्ह्यात रेशीम उत्पादन वाढल्यास त्यापासून साड्या तयार केल्या जाऊ शकतात व बाजारपेठेत या जिल्ह्याचे नाव होऊ शकते, कमी भांडवलात अधिक नफा मिळवून देणारा हा उद्योग असल्याने शेतकऱ्यांसाठी उपजीविकेचे एक चांगले साधन होऊ शकते, असे विभागीय आयुक्त अनुपकुमार म्हणाले.रेशमापासून फक्त कापडच नव्हे तर औषध, कॉस्मेटिक वस्तूही निर्माण करता येतात. या उत्पादनाला बाजारात मागणी आहे. प्रकल्पग्रस्तांनी या उद्योगात पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. काद्री यांनी केले.मानवी गरजा वाढल्या असल्याने त्या भागविण्यासाठी उत्पादन वाढीची पूरक साधने शोधणे शेतकऱ्यांना आवश्यक आहे. त्यासाठी रेशीम उद्योग एक चांगला पर्याय आहे, असे डॉ. माधवी खोडे म्हणाल्या. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. संचालन सहायक आयुक्त राजलक्ष्मी शहा यांनी केले. (प्रतिनिधी)