शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धापेवाडा यात्रेवरील बंधने शिथिल करण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 21:17 IST

कोरोना संक्रमण वाढू नये याकरिता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी प्रतिपंढरपूर धापेवाडा येथे आयोजित देवशयनी आषाढी एकादशी यात्रा व आषाढी पौर्णिमा यात्रेवर लागू केलेली विविध बंधने शिथिल करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नकार दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : देवस्थानला जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याची मुभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमण वाढू नये याकरिता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी प्रतिपंढरपूर धापेवाडा येथे आयोजित देवशयनी आषाढी एकादशी यात्रा व आषाढी पौर्णिमा यात्रेवर लागू केलेली विविध बंधने शिथिल करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नकार दिला. बंधने शिथिल करण्यासाठी धापेवाडा येथील स्वयंभू श्री विठ्ठल-रुख्मिणी देवस्थानने रिट याचिका दाखल केली होती.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. देवस्थानतर्फे १ जुलै रोजी देवशयनी एकादशी यात्रा आणि ५ व ६ जुलै रोजी आषाढी पौर्णिमा यात्रा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी २७ जून रोजी आदेश जारी करून धापेवाडा येथे दिंडी व पालखी घेऊन येण्यास, मंदिर, मंदिर परिसरात व गावामध्ये सवाद्य मिरवणूक काढण्यास, सत्कार समारंभ, धार्मिक सभा, भक्ती संगीत, मेळावे घेण्यास, यात्रा भरवण्यास, सामूहिक प्रार्थना व तीर्थवाटप करण्यास मनाई केली. त्यावर देवस्थानने आक्षेप घेतला होता. ओडिशातील जगन्नाथ यात्रेच्या धर्तीवर धापेवाडा यात्रेवरील बंधने शिथिल करण्यात यावी, अशी देवस्थानची मागणी होती. परंतु, उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. यासोबतच देवस्थानला यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याची मुभा दिली. देवस्थानने त्यांचे मुद्दे मांडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर विचार करून योग्य तो आदेश जारी करावा, असे उच्च न्यायालयाच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. परिणामी, देवस्थानला अल्प दिलासा मिळाला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयReligious programmeधार्मिक कार्यक्रम