शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कदायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
4
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
5
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
6
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
7
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
8
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
9
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
10
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
11
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
12
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
13
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
14
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
15
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
16
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
17
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
18
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
19
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
20
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

तांदूळ वाहतूक कंत्राटाचा कार्यादेश जारी करण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 21:44 IST

एफसीआय गोदाम ते अमरावती जिल्ह्यातील शाळांपर्यंत तांदूळ वाहतूक करण्याच्या कंत्राटाचा कार्यादेश जारी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तात्पुरती मनाई केली.

ठळक मुद्देहायकोर्टचा सरकारला दणका : कंत्राटासाठी अपात्र ठरवलेल्या ‘एनएसीओएफ’ची याचिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एफसीआय गोदाम ते अमरावती जिल्ह्यातील शाळांपर्यंत तांदूळ वाहतूक करण्याच्या कंत्राटाचा कार्यादेश जारी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तात्पुरती मनाई केली.या कंत्राटाकरिता अपात्र ठरविण्यात आल्यामुळे नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स प्रोक्युरमेंट, प्रोसेसिंग अ‍ॅन्ड रिटेलिंग को-ऑपरेटिव्ह ऑफ इंडिया (एनएसीओएफ) यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी वरील अंतरिम आदेशाद्वारे राज्य सरकारला दणका दिला. तसेच, राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावून याचिकेवर ३० जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.एफसीआय गोदाम ते अमरावती जिल्ह्यातील शाळांपर्यंत तांदूळ पोहचवून देण्याच्या कंत्राटाकरिता निविदा मागवण्यात आल्या होत्या. याचिकाकर्त्याची निविदा तांत्रिक बोलीच्या टप्प्यावर नामंजूर करण्यात आली. युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला नाही म्हणून हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय अवैध असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. निविदा नोटीसमधील अटींमध्ये युनिक आयडेंटिफिकेशन नंबर सादर करण्याचा समावेश नव्हता. केवळ अन्नधान्य पुरवठ्यासंदर्भातील व २०१७-२०१८ आणि २०१८-१९ या वर्षातील आर्थिक उलाढालीचे प्रमाणपत्र द्यायचे होते. त्या प्रमाणपत्रांसह निविदा सादर केली होती. त्यामुळे निविदा नामंजूर करण्याचा निर्णय चुकीचा आहे असे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच, निविदेतील अटींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. परिणामी, त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अक्षय नाईक व अ‍ॅड. यशराज किनखेडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयfoodअन्नGovernmentसरकार