शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कामात समाधान असेल तर प्रगतीही शक्य

By admin | Updated: July 31, 2014 01:05 IST

समाधान मिळत नसेल तर, त्या कामाला अर्थ नाही. अनेकजण आयुष्यभर नोकरी करतात. मात्र ते आपल्या कामात समाधानी नसतात. मुळात ते मनाने काम करीत नाही. कामात जर समाधान

गोपीचंद रामटेके : निर्मला मुकादम जीवनगौरव पुरस्कारनागपूर : समाधान मिळत नसेल तर, त्या कामाला अर्थ नाही. अनेकजण आयुष्यभर नोकरी करतात. मात्र ते आपल्या कामात समाधानी नसतात. मुळात ते मनाने काम करीत नाही. कामात जर समाधान असेल तर प्रगतीची दारे नक्कीच उघडतात, असे मत प्रसिद्ध फिजिओथेरेपिस्ट व रवी नायर कॉलेज आॅफ मेडिकल सायन्स, सावंगीचे संचालक डॉ. गोपीचंद रामटेके यांनी व्यक्त केले. नारक ोडतर्फे फिजिओथेरेपी क्षेत्रातील डॉ. निर्मला मुकादम जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. सत्काराप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. नारकोड ही फिजिओथेरेपी क्षेत्रात काम करणारी मध्य भारतातील सर्वात मोठी संस्था आहे. संस्थेच्यावतीने दरवर्षी डॉ. निर्मला मुकादम जीवनगौरव पुरस्काराने या क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्कृत करण्यात येते. यंदा या पुरस्काराने गोपीचंद रामटेके यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याला डॉ. बी. जे. सुभेदार, डॉ. स्नेहा देशपांडे, डॉ. जे. आर. खेर, नारकोडच्या संचालक डॉ. नीता मोडक, डॉ. गंधे उपस्थित होते. डॉ. सुभेदार यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. डॉ. रामटेके १९७४ पासून फिजिओथेरपी या क्षेत्रात कार्यरत आहे. मेडिकल सायन्समध्ये फिजिओथेरपी हे क्षेत्र कमी दर्जाचे गणले जाते. पूर्वी याला हातपाय हलविण्याचा कोर्स म्हणून चेष्टा करायचे. मात्र या क्षेत्रात रामटेके यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी मेडिकलमध्ये कार्य केले आहे. ते कार्यरत असताना या विभागाचा दर्जा वाढविला आहे. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांपेक्षा फिजिओच्या विद्यार्थ्यांना अधिक स्टायपंड मिळवून दिला आहे. हे सर्व सातत्याने काम केल्याने आणि कामामध्ये समाधानी असल्यानेच शक्य झाले आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)