शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील पट्टे वाटपाची प्रक्रिया ठप्पच : उद्दिष्ट दहा हजारांचे वाटप झाले तीन हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 00:43 IST

राज्य सरकारने सप्टेंबर २०१९ पर्यंत नागपूर शहरातील १० हजार झोपडपट्टीवासी कुटुंबांना मालकी पट्टे वाटप करण्याचे निर्धारित केले होते. परंतु ऑक्टोबर संपला तरी जेमतेम तीन हजार झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे देण्यात आले.

ठळक मुद्देझोपडपट्टीधारकांना कधी मिळणार मालकी पट्टे ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने सप्टेंबर २०१९ पर्यंत नागपूर शहरातील १० हजार झोपडपट्टीवासी कुटुंबांना मालकी पट्टे वाटप करण्याचे निर्धारित केले होते. परंतु ऑक्टोबर संपला तरी जेमतेम तीन हजार झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे देण्यात आले. गेल्या महिनाभरापासून पट्टेवाटपाची प्रक्रिया ठप्प आहे. त्यातच नासुप्रने ऑगस्ट २०१९ पर्यंत प्राप्त अर्जधारकांनाच पट्टे वाटप करण्याची भूमिका घेतली आहे. त्यानतंर आलेले अर्ज महापालिकेकडे पाठविण्यात येणार आहे. नासुप्र बरखास्तीची प्रक्रिया सुरू असल्याने तांत्रिक अडचणीमुळे नासुपचे पट्टेवाटप रखडले आहे.ऑक्टोबर अखेरपर्यंत महापालिके च्या जागेवरील ११०० झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यात आले, तर नासुप्रच्या जागेवरील १९०० झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यात आले आहे. शहरातील झोपडपट्ट्या प्रामुख्याने नासुप्र, नझुल व महापालिकेच्या जागेवर वसलेल्या आहेत. या तिन्ही विभागाच्यावतीने पट्टे वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. महापालिकेच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाची प्रक्रिया सेलच्यावतीने राबविली जात आहे. यात १३ झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. ऑक्टोबरअखेरीस महापालिकेने ११०० झोपडपट्टीधाकांना पट्टे वाटप केले आहे. नासुप्रच्या जागेवरील वस्त्यांतील १३२९ झोपडपट्टीधारकांची रजिस्ट्री ऑगस्ट २०१९ पर्यंत झाली होती. आता ही संख्या १९०० पर्यंत गेली आहे. नझुलच्या जागेवरील झोपडपट्ट्यांचा सर्वे महापालिकेने केला आहे. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. नझुलच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना अद्याप पट्टे वाटप सुरू करण्यात आलेले नाही.राज्य सरकारने झोपडपट्टीवासीयांना पट्टे वाटपाची घोषणा केल्यानंतर नासुप्रची यंत्रणा कामाला लागली होती. यासाठी विभागस्तरावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कामाला गती आली होती. मात्र नासुप्र बरखास्तीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पट्टे वाटपाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. महापालिका व नझुलच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण केले. परंतु याला गती देण्याची गरज आहे. नझुलच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप प्रक्रिया संथच आहे.पट्टे वाटप तातडीने करानासुप्र बरखास्तीच्या निर्णयाचा पट्टे वाटप प्रक्रियेला फटका बसण्याची शक्यता आहे. सरकारच्या मालकी पट्टे वाटपाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला खीळ बसू नये, यासाठी नासुप्रच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्याची प्रक्रिया पूर्ववत सुरू ठेवावी. यासाठी शासनाने निर्देश द्यावे, अशी मागणी शहर विकास मंचचे संयोजक अनिल वासनिक यांनी केली आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका