शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मतिमंदांच्या समस्या ही सामाजिक जबाबदारी

By admin | Updated: July 27, 2015 04:23 IST

मतिमंद बालक ही समाजाची समस्या आहे. त्यामुळे या समस्येवर उपाय शोधून काढणे ही समाजाची जबाबदारी आहे.

नागपूर : मतिमंद बालक ही समाजाची समस्या आहे. त्यामुळे या समस्येवर उपाय शोधून काढणे ही समाजाची जबाबदारी आहे. काहीही दोष नसताना उपेक्षितांचे जगणे मतिमंदांच्या नशिबी येत असल्यामुळे समाजाने त्याचा विचार करून मतिमंदांना स्वीकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले.स्वीकार मतिमंद, स्वमग्न, सी. पी. व बहुविकलांग मुलांच्या पालकांच्या संस्थेतर्फे आठव्या जागृती विशेषांकाचे विमोचन बजाजनगरातील जानकी सभागृहात करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नेत्रतज्ज्ञ डॉ. मुकुंद ओक, नीरीचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. चलपतीराव, स्वीकारच्या उपाध्यक्ष आणि जागृती विशेषांकाच्या संपादिका चित्रा कामथ, स्वीकारचे अध्यक्ष गोपाळ बोबडे, सुधाकर झाडगावकर, र. ग. गोखले उपस्थित होते. स्वीकारच्या उपाध्यक्ष चित्रा कामथ यांनी जागृती विशेषांकाबद्दल माहिती दिली. अंकात मतिमंदांचे लेख असून अपंगांबद्दल समाजाचे गैरसमज दूर करणे, त्यांच्या समस्यांची माहिती समाजाला देणे हे या अंकाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. र. ग. गोखले म्हणाले, मतिमंद मुलांना त्यांचे हक्क मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी कायद्यात बदल होत आहेत. राईट आॅफ डिसअ‍ॅबिलीटी पर्सन अ‍ॅक्ट २०१६ मध्ये पारित होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मिहानमधील १० ते १५ उद्योगात मतिमंदांना रोजगार मिळणार असून मतिमंदांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष तरतूद करून ४५ संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. प्रशिक्षणादरम्यान एक हजार रुपये महिना आणि येण्याजाण्याच्या खर्चापोटी १५०० रुपये मतिमंदांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोपाळ बोबडे म्हणाले, मतिमंद मुलांना सर्वसामान्यांसारखे जीवन जगता यावे यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. डॉ. सी. व्ही. चलपतीराव यांनी मतिमंदांविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. मुकुंद ओक म्हणाले, मतिमंदांविषयी हळुहळु सामाजिक बांधिलकी विकसित होत आहे. स्वीकारच्या माध्यमातून ही भावना जागृत होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात जागृती विशेषांकाचे टंकलेखन करणाऱ्या चैतन्न बल्लाळ आणि आदित्य दामले या मतिमंद मुलांचा सत्कार करण्यता आला. संचालन मीनाक्षी दामले यांनी केले. आभार आनंद फडके यांनी मानले. (प्रतिनिधी)