शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कॅपिटल हाईट्सला सेव्हन स्टार क्रिसील रेटींगचा बहुमान

By admin | Updated: September 25, 2015 03:50 IST

टाटा सन्स लिमिटेड या देशातील सर्वात मोठ्या समूहाच्या टाटा रिअ‍ॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या नागपुरातील कॅपिटल हाईट्स ...

नागपुरातील पहिला प्रकल्प : ट्रिलियम मॉल तयार करण्याची घोषणानागपूर : टाटा सन्स लिमिटेड या देशातील सर्वात मोठ्या समूहाच्या टाटा रिअ‍ॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या नागपुरातील कॅपिटल हाईट्स या प्रकल्पाला प्रतिष्ठेचा सेव्हन स्टार क्रिसील रेटींगचा बहुमान मिळाला आहे, अशी माहिती टाटा रिअ‍ॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे रिअल इस्टेटचे प्रमुख अभिजित माहेश्वरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.टाटा रिअ‍ॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या विकासात्मक वाटचालीबाबत बोलताना अभिजित माहेश्वरी म्हणाले, प्रीमिअम रेसिडेन्सीयल अपार्टमेंटला सेव्हनस्टार रेटींग मिळणारा कॅपिटल हाईट्स हा नागपुरातील एकमेव प्रकल्प आहे. प्रकल्पात रहिवाशांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यात क्लब हाऊस, मल्टीप्लेक्स, फूड कोर्ट, सर्व वयोगटासाठी डायनिंगची व्यवस्था, इन डोअर गेम्स, चिल्ड्रेन अँड सिनिअर सिटीझन्स एरिया, योगा कोर्ट, अ‍ॅम्पीथिएटर, जिम्नॅशियम, स्क्वॉश कोर्ट, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, चिल्ड्रेन प्ले एरिया, सायकलिंग ट्रॅक आदींची सुविधा राहणार आहे. कॅपिटल हाईट्स रेसिडेन्सेस ही एक ग्रीन बिल्डींग असून यात जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश आणि व्हेंटिलेशनची सुविधा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कॅपिटल हाईट्स या प्रीमिअम रेसिडेन्सेसनंतर आता ट्रिलियम मॉल उभारण्यात येणार आहे. हा मॉल ४ लाख चौरसफूटांच्या भव्य जागेत साकारण्यात येईल. आगामी दोन वर्षात हा मॉल तयार होणार आहे. मॉलमध्ये शॉपिंग, मनोरंजन आणि डायनिंगची प्रशस्त व्यवस्था राहणार आहे. सर्व मॉल वातानुकूलित राहणार आहे. मॉलचे डिझाईन आर. के. असोसिएट या आर्किटेक्चरल फर्मने तयार केले आहे. शहराच्या मध्यभागी असल्यामुळे नागरिकांना हा मॉल अतिशय सोयीचा ठरणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याशिवाय टाटा रिअ‍ॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडतर्फे कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीनुसार सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे माहेश्वरी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला विपणन प्रमुख सौरभ जैन आणि कर्मचारी उपस्थित होते. (वा. प्र.)