शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-मुंबईदरम्यान आता लवकरच धावणार खासगी रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 08:36 IST

मुंबई-१ क्लस्टर अंतर्गत नागपूर आणि मुंबईदरम्यान दोन जोडी खासगी रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

आनंद शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारने ज्या मार्गावर खासगी क्षेत्राला रेल्वेचे परिचालन करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामध्ये नागपूर-मुंबई मार्गाचा समावेश आहे. याशिवाय अकोला-मुंबई मार्गावर खासगी संस्थांना रेल्वे चालविण्याचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव आहे.खासगी रेल्वे चालविण्यासाठी रेल्वेतर्फे खासगी संस्थांकडून मागविण्यात आलेल्या आवेदनातून संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जमा करण्याची अंतिम तारीख ८ सप्टेंबर २०२० निश्चित केली आहे. त्यानंतर ६० दिवसात खासगी कंपन्यांची यादी तयार करण्यात येईल आणि नंतर बोली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खासगी रेल्वे रुळावर धावतील.रेल्वे मंत्रालयाने देशातील १२ क्लस्टर अंतर्गत २२४ खासगी रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या बोलीसाठी रेल्वे आवेदन (आरएफक्यू) मागितले आहेत. या रेल्वेपैकी मुंबई-१ क्लस्टर अंतर्गत नागपूर आणि मुंबईदरम्यान दोन जोडी खासगी रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.खासगी रेल्वे चालविण्याबाबत जारी केलेल्या प्रस्तावित वेळापत्रकानुसार मुंबई-नागपूर खासगी रेल्वे गुरुवारी मुंबईहून रवाना होऊन ८२० किमीचे अंतर कापून १०.३० तासात गुरुवारीच नागपुरात पोहोचेल. याचप्रकारे नागपूर-मुंबई खासगी रेल्वे गुरुवारी मुंबईकडे रवाना होऊन ११.०५ तासात शुक्रवारी मुंबईला पोहोचेल. या दोन्ही रेल्वे आठवड्यात सहा दिवस धावतील.एक अन्य खासगी रेल्वे मुंबई-नागपूरदरम्यान धावेल. यामध्ये मुंबई-नागपूर खासगी रेल्वे बुधवारी मुंबईहून रवाना होऊन १०.२० तासात बुधवारीच नागपुरात येईल तर नागपूर-मुंबई खासगी रेल्वे गुरुवारी नागपुरातून निघून १०.३५ तासात शुक्रवारी मुंबईला पोहोचेल. या दोन्ही रेल्वे आठवड्यात केवळ एक दिवस धावणार आहे. परंतु या खासगी रेल्वे रुळावर धावण्यासाठी सध्या वेळ आहे.अकोला-मुंबईकरिता खासगी रेल्वेविदर्भातील अकोला आणि मुंबईदरम्यान एक जोडी रेल्वे धावणार आहे. यामध्ये मुुंबई-अकोला खासगी रेल्वे मुंबईहून मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी रवाना होऊन १४.३० तासात बुधवार, शनिवार आणि सोमवारी अकोल्यात येईल. याचप्रकारे अकोला-मुंबई खासगी रेल्वे बुधवार, शनिवार आणि सोमवारी अकोल्याहून निघून १३.५० तासात मंगळवार, गुरुवार आणि रविवारी मुंबईला पोहोचेल.सांकेतिक प्रकल्पात २३३० कोटींची गुंतवणूक२२४ खासगी रेल्वे चालविण्यासाठी भारतीय रेल्वेला १२ क्लस्टरमध्ये विभाजित केले आहे. यामध्ये मुंबई-१ क्लस्टर अंतर्गत १६ खासगी रेल्वे चालविण्यात येणार आहे. यामध्ये नागपूर आणि अकोल्याच्या रेल्वेचा समावेश आहे. या सर्व रेल्वे चालविण्यासाठी रेल्वेने २३३० कोटींची गुंतवणूक सांकेतिक प्रकल्पात निश्चित केली आहे. या रेल्वे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) आणि डिझाईन, बिल्ड, फायनान्स आणि आॅपरेट (डीबीएफओ) तत्त्वावर खासगी संस्थांतर्फे चालविण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे