शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी प्रवासी वाहनांचे पार्किंग नागपूर शहराबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 01:05 IST

अमरावती व वर्धा रोडवरील खासगी प्रवासी वाहनांच्या पार्किंगसाठी शहराबाहेर स्वतंत्र व्यवस्था केली जाईल अशी माहिती विभागीय आयुक्तांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.

ठळक मुद्देहायकोर्टात माहिती : अमरावती व वर्धा रोडवर स्वतंत्र व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमरावती व वर्धा रोडवरील खासगी प्रवासी वाहनांच्या पार्किंगसाठी शहराबाहेर स्वतंत्र व्यवस्था केली जाईल अशी माहिती विभागीय आयुक्तांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.शहरातील पार्किंग, वाहतूक कोंडी, अतिक्रमण, फेरीवाले यासह विविध समस्यांवर उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहेत. न्यायालयाने या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्या समितीमध्ये सर्वच संबंधित विभागाचे उच्चाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्या समितीने स्थानिकस्तरावर आवश्यक निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन केली आहे. उपसमितीच्या बैठकीमध्ये वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी अमरावती व वर्धा रोडवरील खासगी प्रवासी वाहनांच्या पार्किंगसाठी शहराबाहेर स्वतंत्र व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या प्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र आहेत.सात हजारांवर पालकांनी दिले प्रतिज्ञापत्रअल्पवयीन मुलामुलींना ५० सीसीवरील दुचाक्या चालविण्याची परवानगी नाही. परंतु, हा नियम कागदावरच आहे. अल्पवयीन मुले-मुली सर्रास शक्तिशाली दुचाक्या चालवित आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी न्यायालयाने अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या पालकांकडून त्यांची अपत्ये शक्तिशाली दुचाक्या चालविणार नाहीत व चालविल्यास कोणत्याही दुर्घटनेस पालक जबाबदार राहतील असे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार सात हजारावर पालकांकडून असे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.शहरात ५६९ अवैध गोठेदुग्ध विकास विभागाचे अधिकाºयांनी सर्वेक्षण केले असता शहरामध्ये ५६९ अवैध गोठे आढळून आलेत. त्यापैकी २०० गोठ्यांच्या मालकांवर कारवाई करण्यात आली असून उर्वरित गोठ्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अवैध गोठ्यांमुळे त्या-त्या परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दूध काढणे झाल्यानंतर जनावरांना मोकाट सोडले जाते. त्यामुळे जनावरे रोडवर जाऊन बसतात. त्यातून वाहतूक कोंडी होते. अपघात घडतात. समस्या मुळासकट संपविण्याकरिता अवैध गोठे शोधून काढण्यासाठी नगरसेवकांची मदत घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTravelप्रवास