शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात खासगी डॉक्टरांचा सोमवारी संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 23:59 IST

कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा निषेधार्थ नागपूरसह देशभरातील ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे (आयएमए) सदस्य, खासगी डॉक्टर्स सोमवारी एक दिवस कडकडीत बंद पाळणार आहेत. मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टर काळ्या फिती व डोक्यावर पांढरी पट्टी बांधून सेवा देणार आहेत.

ठळक मुद्देपॅथॉलॉजी, एक्स-रे ही असणार बंद : मेयो, मेडिकलचे डॉक्टर देणार काळ्या फिती बांधून सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा निषेधार्थ नागपूरसह देशभरातील ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे (आयएमए) सदस्य, खासगी डॉक्टर्स सोमवारी एक दिवस कडकडीत बंद पाळणार आहेत. मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टर काळ्या फिती व डोक्यावर पांढरी पट्टी बांधून सेवा देणार आहेत.तरुण डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद शुक्रवारी देशभरात उमटले. राज्यातील निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन करून लक्ष वेधले. आयएमए नागपूरनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला. डॉक्टरांवर वाढते हल्ले थांबविण्यासाठी कठोर कायद्याची गरज असल्याने सोमवारपासून ‘मार्ड’ संघटना आता आंदोलन उभे करणार आहे. नागपूर मेडिकल मार्डचे अध्यक्ष डॉ. मुकुल देशपांडे म्हणाले, दिल्लीच्या ‘युनियन रेसिडन्ट डॉक्टर’ने ४८ तासांच्या संपाचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. आपल्याकडे ही संघटना नाही. तसेच रुग्णाचे हित जोपसता तूर्तास तरी कामबंद आंदोलन न करता विविध आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायद्यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.केवळ गंभीर रुग्णांवरच उपचार‘आयएमए’ नागपूर शाखेने सर्व खासगी डॉक्टरांना सोमवारी सकाळी ६ पासून ते मंंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संपावर जाण्याचे आवाहन आयएमचे नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला, सचिव डॉ. मंजुषा गिरी, डॉ. यशवंत देशपांडे, डॉ. कृष्णा पराते, डॉ. आनंद काटे, डॉ. दिलीप गोडे. डॉ. प्रकाश देव, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. संजय देशपांडे आदींनी केले आहे. या बंदमध्ये केवळ गंभीर रुग्णांनाच तपासण्यात यावे असेही म्हटले आहे. या संपात एक्स-रे, पॅथालॉजी सेंटरही सहभागी होणार असल्याचे डॉ. झुनझुनवाला यांनी सांगितले.

 

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंप