शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कोरोना रुग्णालये मनमानी बिले आकारतात : मनपाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 20:37 IST

Private Corona hospitals charge arbitrary bills खासगी कोरोना रुग्णालये राज्य सरकारच्या निर्देशांचे पालन करीत नाहीत. ते मनमानी बिले आकारतात असा गंभीर आरोप महानगरपालिकेने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष केला.

ठळक मुद्देसरकारच्या निर्देशांचे पालन करीत नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : खासगी कोरोना रुग्णालये राज्य सरकारच्या निर्देशांचे पालन करीत नाहीत. ते मनमानी बिले आकारतात असा गंभीर आरोप महानगरपालिकेने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष केला.

राज्य सरकारने कोरोना उपचार दरासंदर्भात ३१ आॅगस्ट २०२० रोजी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, खासगी रुग्णालयांतील ८० टक्के कोरोना रुग्णांवर सरकारी दराने उपचार करणे आवश्यक आहे. परंतु, खासगी रुग्णालये या अधिसूचनेचे पालन करीत नाहीत. कोरोना रुग्णांना मनमानी बिले दिले जात आहेत. यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच, खासगी रुग्णालये उपचार दर व बिलासंदर्भात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करतात असेही मनपाने न्यायालयाला सांगितले.

इंडियन मेडिकल असोसिएशन व विदर्भ हॉस्पिटल्स असोसिएशन यांनी मनपाचे आरोप फेटाळून लावले. खासगी रुग्णालयांना नोटीस बजावून केवळ पाच दिवसात माहिती मागितली जाते. एवढ्या कमी वेळेत आवश्यक माहिती देणे शक्य नाही. याकरिता  किमान तीन आठवडे वेळ देणे आवश्यक आहे असे इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितले. मनपा कारवाई करताना खासगी रुग्णालयांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करते. मनपाला संबंधित माहिती मागण्याचा काहीच अधिकार नाही. यासंदर्भात कायदा अस्तित्वात नाही असा दावा विदर्भ हॉस्पिटल्स असोसिएशनने केला.

लेखी स्वरुपात भूमिका मांडा

न्यायालयाने सदर आरोप-प्रत्यारोप लक्षात घेता इंडियन मेडिकल असोसिएशन व विदर्भ हॉस्पिटल्स असोसिएशन यांना त्यांची भूमिका लेखी स्वरुपात मांडण्याचे निर्देश दिले. तसेच, मनपाला त्यांच्या भूमिकेवर उत्तर सादर करण्यास सांगितले.

वेबसाईट नियमित अपडेट करा

जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार, ‘कोविड नागपूर डॉट इन’ ही वेबसाईट सुरू केली आहे. परंतु, ही वेबसाईट नियमित अपडेट केली जात नाही अशी माहिती मध्यस्थ मितीशा कोटेचा यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने ही बाब गंभिरतेने घेऊन सर्व रुग्णालयांनी कोरोनासंदर्भातील माहिती तातडीने अपडेट करावी व १ जून पासून यामध्ये सातत्य ठेवावे असे आदेश दिले. तसेच, यात गलथानपणा केल्यास कडक कारवाई केली जाईल अशी तंबी दिली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल