शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कैदी करतात जीवघेणी मोबाईल चार्जिंग

By admin | Updated: April 3, 2015 01:46 IST

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात मोठ्या प्रमाणावर कैद्यांपर्यंत पोहोचलेले मोबाईल कसे चार्ज केले जातात,

राहुल अवसरे ल्ल नागपूरनागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात मोठ्या प्रमाणावर कैद्यांपर्यंत पोहोचलेले मोबाईल कसे चार्ज केले जातात, असा अनेकांना प्रश्न पडला असेल. कैदी स्वत:चा जीव धोक्यात घालूनच मोबाईल चार्ज करीत होते, अशी धक्कादायक माहिती आहे. पाच खतरनाक कैद्यांच्या पलायनानंतर कदाचित कारागृहातील मोबाईलचा वापर बंद झाला असेल ? पण एरव्ही मोबाईल हे येथील कैद्यांसाठी ‘लाईफ लाईन’ ठरले होते. सूत्रांच्या माहितीनुसार इतर कैद्यांची निजानीज झाल्यानंतर कोणी पत्नीसोबत, कोणी प्रेयसीसोबत, कोणी मित्र आणि नातेवाईकांसोबत तासन्तास बोलायचे, पहाटे २-३ वाजेपर्यंत बोलणे सुरू असायचे. खंडणीसाठी आणि वकिलांचा सल्ला घेण्यासाठीही मोबाईलचा मोठा वापर होत होता. प्रत्येक बराकींमध्ये कैद्यांच्या मनोरंजनासाठी टीव्ही आहेत. टीव्हीचे होल्डर पिन लावण्याचा बोर्ड बराकीतच राहत होता. कैदी विजेच्या बोर्डमधून आपापला मोबाईल चार्ज करीत असतात, ही बाब कारागृह अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच बोर्ड बराकीच्या बाहेर करण्यात आला. तरीही कैद्यांनी हार मानली नव्हती. त्यांनी नवीन शक्कल लढवली होती. ती जीवघेणी होती. मोबाईल चार्जचा वायर कापून होल्डर पिन फेकून देत होते आणि चार्जरची वायर छताचा पंखा किंवा लाईटच्या वायरला जोडत होते. हे करताना आपल्याला विजेचा धक्का लागून मृत्यू येईल याची भीतीही त्यांना नव्हती. कारवाई होऊनही बिनधास्तपणे मोबाईलचा वापर होत होता.