शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

उद्योजकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 20:34 IST

उद्योजकांचे प्रश्न व निगडित समस्या सोडविण्यास राज्य सरकार प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या (बीएमए) बुटीबोरी येथील आधुनिक सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

ठळक मुद्देबीएमए सभागृहाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उद्योजकांचे प्रश्न व निगडित समस्या सोडविण्यास राज्य सरकार प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या (बीएमए) बुटीबोरी येथील आधुनिक सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. समीर मेघे, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर होते. ग्रामपंचायत कराचे योग्य निर्धारण लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी १८ फेब्रुवारी २०१८ ला मुंबईत होणाºया मॅग्नेटिक महाराष्ट्र या जागतिक स्तराच्या कार्यक्रमाची माहिती दिली आणि विदर्भातील उद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर त्याचा उपयोग आपल्या उद्योग वाढीसाठी करावा, असे आवाहन केले.फडणवीस म्हणाले, रेडी रेकनरचे वाढीव दर हा राज्यस्तरीय विषय असून त्याचे लवकरच निर्धारण करण्यात येईल. मोठ्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी अतिरिक्त २२० केव्हीएचे सबस्टेशन लगेच उभारण्यात येईल. मेट्रो रेल्वे बुटीबोरीपर्यंत नेण्यावर सकारात्मक निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी विभागीय आयुक्त अनुपकुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, एमआयएचे अध्यक्ष कॅ. सी.एम. रणधीर, सचिव चंद्रशेखर शेगांवकर, सीआयआयचे विदर्भ प्रांत अध्यक्ष आशुतोष त्रिपाठी, व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, एनव्हीसीसीचे माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल, वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारख, एमआयडीसीचे सहसंचालक अशोक धर्माधिकारी, महाव्यवस्थापक गजेंद्र भारती, प्रादेशिक अधिकारी जे.बी. संगीतराव, मुख्य अभियंता एस.आर. वाघ, कार्यकारी अभियंता मोडावे, एस.एस. आकुलवार, महावितरणचे अधीक्षक अभियंता मनीष वाठ, कार्यकारी अभियंता डी.यू. घाटोळ उपस्थित होते.कार्यक्रमात असोसिएशनचे मानद सचिव जीवन धीमे, उपाध्यक्ष पुनित महाजन व मनीष सिंघवी, कोषाध्यक्ष प्रशांत मेश्राम, माजी अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, हेमंत अंबासेलकर, के.एन. सिथा यांच्यासह पदाधिकारी राकेश सुराणा, रवी अग्रवाल, जयसिंग चव्हाण, प्रदीप राऊत, संजय नागुलवार, संजय भालेराव, अल्केश सराफ, सी.पी. सरकार, सीए मिलिंद कानडे आणि कॅल्डरीज, इंडोरामा, रिलायन्स पॉवर, सिएट टायर्स, एसएमएस इनोकेअर, इनोव्हेटिव्ह टेक्सटाईल या कंपन्यांचे उच्च अधिकारी उपस्थित होते. संचालन सीए मिलिंद कानडे यांनी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर