शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

अर्थसंकल्पात प्रलंबित योजनांना प्राधान्य

By admin | Updated: March 24, 2016 02:38 IST

महापालिकेच्या २०१६-१७ या वर्षाच्या अर्थसंकल्पात नवीन मोठ्या योजनांचा समावेश न करता मागील चार वर्षातील

नागपूर : महापालिकेच्या २०१६-१७ या वर्षाच्या अर्थसंकल्पात नवीन मोठ्या योजनांचा समावेश न करता मागील चार वर्षातील प्रलंबित प्रकल्प व योजना पूर्ण करण्याला प्राधान्य देऊ न आश्वासन पूर्तीकडे वाटचाल राहणार आहे. पुढील वर्षात निवडणूक असल्याने कोणत्याही स्वरूपाची करवाढ न करता नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न राहील. रविवारी २७ मार्चला महापालिकेच्या विशेष सभेत स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त हा अर्थसंकल्प सादर करणार आहे. ३०० कोटींच्या सिमेंट रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यात राज्य सरकार, नासुप्र व महापालिका यांचा प्रत्येकी १०० कोटींचा वाटा आहे. पुढील वर्षातही ३०० कोटींचे सिमेंट रस्ते निर्माण केले जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात २०० कोटींची तरतूद अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सिमेंट रस्त्यांसाठी ४० कोटींचीच तरतूद करण्यात आली होती. परंतु एलबीटीमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडल्याने हा निधी उपलब्ध करता आला नाही.महापालिका क्षेत्रात वाढ करण्यात आल्याने नव्याने जोडण्यात आलेल्या हुडकेश्वर व नरसाळा भागात नागरी सुविधांचा अभाव आहे. या भागातील विकास कामांसाठी तरतूद करावी लागणार आहे.शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलांचा प्रश्न मागील काही वर्षांपासून रखडलेला आहे. गेल्यावर्षी अजनी रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपुलासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतु या पुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. यासाठी तरतूद अपेक्षित आहे. मनीषनगर येथील प्रस्तावित उड्डाणपूल, पूर्व नागपुरात प्रस्तावित कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था, कचऱ्यापासून वीज निर्मिती, सांडपाण्यावर प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापन असे मोठे प्रकल्प प्रस्तावित आहेत. फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक असल्याने त्यापूर्वी या कामांना सुरुवात करून विकास कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न नागपूर विकास आघाडीचा आहे. यासाठी तरतूद अपेक्षित आहे. महापालिकेचे उत्पन्न १००० ते ११०० कोटींच्या आसपास आहे. परंतु अर्थसंकल्प २००० हजार कोटीहून अधिक रकमेचा असल्याने मोठ्या प्रमाणात शासकीय अनुदान गृहीत आहे. यात एलबीटीच्या मोबदल्यात ५५० ते ६०० कोटी, तसेच सिमेंट रस्ते व अमृत योजनेंतर्गत अपेक्षित अनुदानाचा समावेश राहणार आहे. (प्रतिनिधी)घोषणांची अंमलबजावणी नाही४ गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात आदर्श वस्ती सुधार योजना, परिसर पालकत्व योजना, मोबाईल टायबस, खाऊ गल्ली, शहर वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, घनकचरा व्यवस्थापन, उत्तर व दक्षिण सिवरेज झोन, महिलासाठी सुलभ शौचालये, महिला स्वयंरोजगार योजना, स्लम भागातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप, तलावांची स्वच्छता व विकास, बाजार व संकुल निर्माण, आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प, वाठोडा येथे क्रीडा संकुलाची निर्मिती, अंबाझरी उद्यानाचा विकास आदी योजनांची घोषणा करण्यात आली होती. परंतु यातील बहुसंग्य योजनांना अद्याप सुरुवात झालेली नाही.