पिवळी शाळेमागे रोज रात्री ताशपत्त्याचा जुगार चालायचा. त्याची माहिती कळताच गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक विनोद चाैधरी, सहायक निरीक्षक पंकज घाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास या जुगार अड्ड्यावर छापा घातला. यावेळी तेथे पोलिसांना आरोपी जावेद शेख शकूर शेख (रा. नवाबपुरा), राजेश ऊर्फ भुऱ्या हरिभाऊ करनुके (वय ३६, रा.जुनी मंगळवारी, ढिवरपुरा), शेख ईम्तियाज शेख जब्बार (वय ५२, रा. चितारओळी), शेख आसिफ शेख मेहबूब (वय ३३, रा. टिमकी कबिर मंदिरजवळ) आणि प्रवीण वामनराव निनावे (वय ३९, रा. लालगंज)यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. तर मोहम्मद रियाज ऊर्फ अच्चू आणि सलीम खान (रा. आदमशहा चौक) हे दोघे पळून गेले. पोलिसांनी उपरोक्त जुगाऱ्यांकडून रोख, मोबाईल, ६ दुचाकी असा एकूण ३ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
----