शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नव्या पिढीत अहिंसेचे तत्त्व रुजवायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:15 IST

वैचारिक मतभेदात हिंसेचे स्थान निर्माण होत असून महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने जग जिंकण्याची दिलेली शिकवणूक नव्या पिढीत रुजविण्याचे कार्य स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी करावे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.

ठळक मुद्देमान्यवरांचे प्रतिपादन : स्वातंत्र्य संग्राम सैनिक पुंडलिकराव गेडाम यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैचारिक मतभेदात हिंसेचे स्थान निर्माण होत असून महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने जग जिंकण्याची दिलेली शिकवणूक नव्या पिढीत रुजविण्याचे कार्य स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी करावे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.नागपूर जिल्हा स्वातंत्र्य संग्राम सैनिक गौरव समितीच्यावतीने माजी मंत्री स्व. शंकरराव गेडाम यांच्या जन्मदिनी त्यांचे बंधु स्वातंत्र्य संग्राम सैनिक डॉ. पुंडलिकराव गेडाम यांचा भरतनगरातील भास्कर सभागृहात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरिभाऊ केदार होते. व्यासपीठावर माजी मंत्री हरिभाऊ नाईक, माजी खासदार गेव्ह आवारी, ज्येष्ठ पत्रकार उमेश चौबे, सर्वोदय आश्रमाच्या कार्याध्यक्ष लीलाताई चितळे, सेवाग्राम प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष मा. म. गडकरी, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्राचार्य महादेव नगराळे उपस्थित होते. माजी मंत्री हरिभाऊ नाईक म्हणाले, स्वातंत्र्यानंतरही देशात सुराज्य निर्माण झाले नसून आजही अनेक प्रश्न कायम आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. लीलाताई चितळे म्हणाल्या, भारत अहिंसेच्या मार्गावर स्वतंत्र झाला आहे. परंतु देशात अहिंसा वाढत असून स्वातंत्र्य सैनिकांनी नव्या पिढीला अहिंसेचा धर्म पटवून देण्याची गरज आहे. उमेश चौबे म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांनी जात-पात न पाहता देश स्वतंत्र केला. परंतु आज देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल होत असून मजुरांचे हक्क हिरावल्या जात आहेत. ही स्थिती बदलविण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशासाठी लढण्याची गरज आहे. गेव्ह आवारी म्हणाले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पनेनुसार भारताची जडणघडण होत आहे की नाही याचा विचार करण्याची गरज आहे.धर्माचा प्रचार करून देशाला तोडणाºया शक्ती डोके वर काढत असून त्यांना रोखणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मा. म. गडकरी यांनी जात, धर्म, पंथ सोडून देशातील जातीवाद नष्ट करण्याचे आवाहन केले. हरिभाऊ केदार यांनी समाजातील तळागाळातील माणूस हे सर्वांचे लक्ष्य असले पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक माजी आमदार यादवराव देवगडे यांनी केले. संचालन सुधा पावडे यांनी केले. आभार हरिभाऊ उमरकर यांनी मानले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य संग्राम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.