शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

पंतप्रधान दौऱ्याची जय्यत तयारी

By admin | Updated: April 11, 2017 02:07 IST

पंतप्रधान नरेंद्र्र मोदी हे येत्या १४ एप्रिल रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत.

पालकमंत्र्यांनी घेतला आढावा : आवश्यक सुविधा पूर्ण करानागपूर : पंतप्रधान नरेंद्र्र मोदी हे येत्या १४ एप्रिल रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पंतप्रधानांच्या नियोजित कार्यक्रमांच्या व्यवस्थेची पाहणी करून कामांचा आढावा घेतला. तसेच आवश्यक सुविधा तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पोलीस उपआयुक्त राजपूत तसेच महावितरण, महानिर्मिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, विविध आयोजन समितीचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. नीती आयोगातर्फे रोखरहित अर्थव्यवथेला चालना देण्यासाठी जनधन (डिजीधन) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शंभरावा मेळावा नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलात पंतप्रधान यांच्या उपस्थितीत १४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भीम कॅश बँक आणि रेफरल स्कीम तसेच भीमआधार यासोबतच डिजीधन व्यापार योजना तसेच मेगा ड्रॉ अंतर्गत निवडण्यात आलेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान आवास योजना, एआयआयएमएस, आयआयएम व आयआयआयटी नागपूर या संस्थांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांचेसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रामदास आठवले, हंसराज अहिर आदी मंत्री तसेच राज्यमंत्री मंडळातील सदस्य उपस्थित राहणार आहे.विभागीय क्रीडा संकुलाच्या परिसरात आयोजित या मेळाव्यात सुमारे १० ते १५ हजार नागरिक उपस्थित राहणार असल्यामुळे उन्हाळ्याच्या दृष्टीने आवश्यक व्यवस्था करताना वाहतूक व्यवस्था तसेच पार्किंग आदी सुविधांची पाहणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. विभागीय क्रीडा संकुलामध्ये निमंत्रितांना बसण्याची मर्यादित व्यवस्था असल्यामुळे या परिसरात सुमारे १० ते १२ हजार नागरिक बसू शकतात तसेच त्यांना क्रीडा संकुलातील कार्यक्रम थेट पाहता येईल अशी व्यवस्था करण्याबाबत पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, तसेच जिल्हाधिकारी यांच्या समवेत प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १४ एप्रिल रोजीच्या दीक्षाभूमी, कोराडी थर्मलपॉवर स्टेशनचे राष्ट्रार्पण, तसेच मानकापूर येथील मुख्य कार्यक्रमाच्या संपूर्ण व्यवस्थेची माहिती घेतली. तसेच या कार्यक्रमासाठी आवश्यक सूचनाही त्यांनी केल्या.(प्रतिनिधी)