शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

‘मेट्रो’च्या ‘चीन कनेक्शन’चा वाद पंतप्रधान दरबारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 20:34 IST

एकीकडे संघ परिवारातील विविध संस्था एकत्रित येऊन देशपातळीवर राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान राबविणार आहेत. मात्र दुसरीकडे नागपूर ‘मेट्रो’चे डब्बे तयार करण्याचे कंत्राट मात्र चीनच्या कंपनीला देण्यात आले आहे.

नागपूर, दि.2 - एकीकडे संघ परिवारातील विविध संस्था एकत्रित येऊन देशपातळीवर राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान राबविणार आहेत. मात्र दुसरीकडे नागपूर ‘मेट्रो’चे डब्बे तयार करण्याचे कंत्राट मात्र चीनच्या कंपनीला देण्यात आले आहे. यासंदर्भात स्वदेशी जागरण मंचाने आक्रमक भुमिका घेतली असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांकडे चर्चेसाठी वेळदेखील मागण्यात आली आहे. सीमेवर भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले असताना तसेच  घरांघरांमध्ये ‘चायनीज’ वस्तूंचे प्रमाण वाढत असताना याविरोधात संघ परिवारातील विविध संस्था एकत्र येऊन आवाज उंचाविणार आहेत. स्वदेशी जागरण मंचातर्फे राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा मोहिमेत आॅगस्टमध्ये देशभरात संघ स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. विदर्भात ५ ते २० ऑगस्टदरम्यान हे अभियान राबविण्यात येणार आहे. मात्र दुसरीकडे संघाचे स्वयंसेवकच सत्तास्थानी असलेल्या नेत्यांनी नागपूर मेट्रोच्या ६९ डब्यांचे ८५१ कोटी रुपयांचे कंत्राट चक्क चीनच्या कंपनीला दिले आहेत. ही दुर्दैवी बाब असून आम्ही सुरुवातीपासून याचा विरोध करत आहोत. देशातच हे डबे बनू द्या, अशी विनंती आम्ही अधिकारी, मंत्र्यांना केली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे आता पंतप्रधानांकडेच दाद मागितली असल्याची माहिती स्वदेशी जागरण मंचच्या विचार विभागाचे अखिल भारतीय प्रमुख अजय पत्की यांनी पत्रपरिषदेदरम्यान दिली.  यावेळी राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान समितीचे विदर्भ संयोजक सुभाष लोहे, उपाध्यक्ष दादाजी उके, सहसंयोजक माधव गोडसे, कर्नल (सेवानिवृत्त) अभय पटवर्धन, कॅप्टन (सेवानिवृत्त) चंद्रमोहन रणधीर, फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, विश्व संवाद केंद्राचे प्रसाद बर्वे, समीर गौतम, रविंद्र बोकारे, अतुल मोघे प्रामुख्याने उपस्थित होते. 

२ लाख घरापर्यंत पोहोचणार स्वदेशी जागरण मंचतर्फे राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा मोहिमेची सुरुवात १२ जानेवारी रोजी करण्यात आली होती. विदर्भात ५ ते २० ऑगस्टमध्ये स्वदेशी पंधरवडा राबविण्यात येईल. यामाध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असून विविध स्वयंसेवी संघटना, व्यावसायिक संघटनांनादेखील यात समाविष्ट करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, वसतीगृहे, बाजारपेठा इत्यादी ठिकाणी जनजागृती करण्यात येईल. ‘चायनिज’ वस्तूंमुळे देशासमोर निर्माण झालेले संकट, त्याचे धोके याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येईल. चीनचे वित्तीय आक्रमण परतावून लावण्यासाठी सर्वांना एकत्र आणण्यात येईल. या १५ दिवसांत नागपुरातील २ लाख घरांपर्यंत तर इतर जिल्ह्यांतील ५० हजार ते १ लाख घरांपर्यंत कार्यकर्ते प्रत्यक्ष पोहोचतील, अशी माहिती अजय पत्की यांनी दिली.