शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

दीक्षाभूमीवरील टपाल तिकिटाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

By admin | Updated: April 7, 2017 02:59 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १४ एप्रिल रोजी दीक्षाभूमीला भेट देणार आहेत.

दर्शनासोबतच व्हावा जाहीर कार्यक्रम : स्मारक समितीचा प्रयत्न नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १४ एप्रिल रोजी दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. यावेळी दीक्षाभूमीवर काढण्यात आलेल्या टपाल तिकिटाचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. या लोकार्पणासाठी दीक्षाभूमीवर पंतप्रधानांचा छोटेखानी जाहीर कार्यक्रम व्हावा, असा प्रयत्न दीक्षाभूमी स्मारक समितीच्यावतीने केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त केंद्र सरकारतर्फे जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या वर्षी १४ एप्रिल रोजी मध्यप्रदेशातील महू येथून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महोत्सवाची सुरुवात केली. वर्षभर कार्यक्रम जाहीर करण्यात आले. या महोत्सवाची सांगता दीक्षाभूमीवर पंतप्रधानांच्याच उपस्थितीत व्हावी, अशी अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने व्यक्त करण्यात आली. त्यासाठी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या वतीने समितीचे निवेदन पंतप्रधानांना पाठविण्यात आले. स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे हे स्वत: हे निवेदन घेऊन गेले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांनी दीक्षाभूमीला भेट द्यावी, यासाठी विशेष पाठपुरावा केला. अखेर या सर्वांच्याच प्रयत्नांना यश आले. ‘दीक्षाभूमी’वर टपाल तिकीट काढण्यात यावे, यासाठी दलित मित्र भूषण दडवे यांनी विशेष प्रयत्न केले होते. शासनाने याची दखल घेत दीक्षाभूमीवर टपाल तिकीट काढले आहेत. परंतु याचे लोकार्पण व्हायचे आहे. ते दीक्षाभूमीवरच पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे, अशी सर्वांची इच्छा आहे. खूप मोठा कार्यक्रम न घेता दीक्षाभूमीवरील नवीन सभागृहात हा लोकार्पणाचा छोटेखानी कार्यक्रम व्हावा, अशी स्मारक समितीची अपेक्षा आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.(प्रतिनिधी) स्मारक समिती करणार पंतप्रधानांचा सत्कार दीक्षाभूमीला सदिच्छा भेट देणाऱ्या गणमान्य अतिथींचे स्मारक समितीच्यावतीने स्वागत केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुद्धा शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाईल. तसेच दीक्षाभूमीची आठवण म्हणून एक स्मृतिचिन्ह भेट दिले जाईल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दीक्षाभूमीची पाहणी केली. यावेळी मध्यवर्ती स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांचा पुतळा परिसर आदींची पाहणी करण्यात आली.