शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षण मातृभाषेत द्यावे

By admin | Updated: March 16, 2015 11:20 IST

देशातील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच देण्यात यावे, या आशयाचा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संमत करण्यात आला.

नागपूर : देशातील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच देण्यात यावे, या आशयाचा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संमत करण्यात आला. केंद्र व राज्य शासनांनी भाषेविषयक धोरणाचा आढावा घ्यावा व प्राथमिक शिक्षण मातृभाषेत देण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन या प्रस्तावांतर्गत करण्यात आले. रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरू असलेल्या या सभेचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. देशविदेशातील विविध भाषांचे शिक्षण घ्यायलाच हवे. परंतु शैक्षणिक अभ्यासक्रमात मातृभाषेचे प्रचंड महत्त्व आहे. यामुळे संस्कृती, परंपरा व जीवनमूल्ये समजण्यास मदत होते. संयुक्त राष्ट्राने याची दखल घेत २१ जानेवारी रोजी मातृभाषा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, मदनमोहन मालवीय यांनीदेखील मातृभाषेतील शिक्षणाचा आग्रह धरला होता. त्यामुळे शिक्षणात याला प्राधान्य द्यायला हवे अशा आशयाचा प्रस्ताव सभेत सकाळच्या सत्रात मांडण्यात आला. या प्रस्तावावर सखोल चर्चा झाली व एकमताने हा संमत करण्यात आला. देशातील नागरिकांनी शिक्षण तसेच व्यावहारिक व सामाजिक जीवनात संवादासाठी मातृभाषेचाच उपयोग करावा. कुटुंबातील सदस्यांनी याला प्रोत्साहन द्यावे व पालकांनी याबाबत आग्रही भूमिका घ्यावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली. सभेच्या अखेरच्या दिवशी संघाच्या भविष्यातील योजनांवर चर्चा झाली. (प्रतिनिधी)आधुनिक तंत्रज्ञानावर भरआजच्या तारखेत संघ विस्तार योग्य दिशेने सुरू आहे. युवा पिढीला जोडण्यासाठी संघाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत असून आधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्यात येत आहे. या माध्यमातून महिन्याला तीन हजारांहून अधिक जण जोडले जात आहेत. बुद्धिजीवी वर्गाप्रमाणेच ग्रामीण भागातील नागरिकदेखील संघशाखांकडे वळत असल्याची माहिती सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी दिली.तीन वर्षांसाठी संघाची प्रमुख उद्दिष्टे> साडेसहा लाख गावांत संघशाखांचा विस्तार करणे> ग्रामविकासाच्या अधिक उपक्रम राबविणे> आदिवासी व वंचितांसाठी अधिकाधिक सेवाकार्याचे नियोजन> समाजातून भेदभाव नष्ट करणे