शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

नवोदित गायकांचा गौरव

By admin | Updated: March 19, 2016 02:41 IST

सखी मंचच्या अभियानात आतापर्यंत २. ५ लाखापेक्षा अधिक कुटुंब लोकमतशी जुळले आहेत. त्यांनी महिलांच्या

नागपूर : सखी मंचच्या अभियानात आतापर्यंत २. ५ लाखापेक्षा अधिक कुटुंब लोकमतशी जुळले आहेत. त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न केला आणि तो यशस्वीही करून दाखविला. यातून महिलांना स्वयंरोजगार आणि आत्मविश्वास मिळाला. त्यांच्या जगण्याला दिशा देण्यात ज्योत्स्ना दर्डा यांचे मोठे योगदान आहे. नागपुरात जवाहरलाल संगीत कला अकादमीची स्थापना करून त्यांनी सहजपणे संगीताचा प्रवाह सखींच्या आयुष्यात आणला. या अकादमीतून आतापर्यंत अनेक सखी आणि सामान्य नागरिकांनीही संगीताचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी आयुष्यभर स्वरांची साधना केली. संगीतावर असणारे त्यांचे विलक्षण प्रेम आणि त्यांची संगीत साधना लक्षात घेता त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यंदा या पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. या पुरस्कारासाठी संगीत क्षेत्रातील मातब्बर संगीतकार नवोदित गायकांची निवड करतात. परीक्षकांनी निवडलेल्या कलावंतांना प्रत्येकी एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र प्रदान करण्यात येते. यंदाही संगीत क्षेत्रातील नवोदित प्रतिभावंतांना सन्मानित करण्याच्या क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. यंदाच्या पुरस्कारांची निवड सुप्रसिद्ध बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया, सुप्रसिद्ध गायक पद्मभूषण पं. राजन-साजन मिश्रा, पार्श्वगायक रुपकुमार राठोड, पार्श्वगायक शंकर महादेवन आणि शशी व्यास या दिग्गज कलावंतांनी केली आहे. राष्ट्रीय स्तरावर कला कौशल्याने स्वत:चा ठसा उमटविणाऱ्या दोन प्रतिभावंत कलावंतांना यंदा स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि प्रत्येकी एक लाख रुपये पुरस्कारादाखल प्रदान करण्यात येतील. पुरस्कारप्राप्त कलावंतांना या समारंभात त्यांच्या सादरीकरणासाठी प्रत्येकी १५ मिनिटांचा वेळ देण्यात येईल. त्यामुळे या नव्या प्रतिभांच्या सादरीकरणाचा आनंदही उपस्थितांना मिळणार आहे. या कलावंताच्या सादरीकरणामुळे त्याच्या प्रतिभेचा परिचय रसिकांना होईल. सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराची चर्चा आता देशविदेशात होत असून हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा झाला आहे. (प्रतिनिधी)के. के. च्या आवाजाची जादू देणार आनंद सुप्रसिद्ध पार्श्वगायक के. के. म्हणजे कृष्णकुमार कुन्नथ. पण चित्रपटसृष्टीत त्यांची ओळख के. के. या नावानेच आहे. गीताला आपल्या आवाजाच्या परिसस्पर्शाने उंचावर नेऊन ठेवण्यात त्यांचे कौशल्य वादातीत आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ मधील ‘तडफ तडफ के इस दिल से आह निकलती रही...’ असो माचिस चित्रपटातले ‘छोड आए हम वो गलिया...’ त्याच्या गीतांनी रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांचा ‘पल’ हा अल्बमही गाजला आहे. या अल्बमला स्टार स्क्रीन अवॉर्डने गौरविण्यात आले. हिंदी,. तेलगू, मल्याळम, तामिळ, कन्नड आदी भाषांतील त्यांनी गायलेली गीते अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग सूर ज्योत्स्ना अवॉर्डच्या निमित्ताने नागरिकांना मिळणार आहे. लोकमत सखी मंच सदस्य आणि वाचकांना नि:शुल्क प्रवेशपत्रहा कार्यक्रम नि:शुल्क असला तरी सर्वांना प्रवेशपत्रावरच प्रवेश देण्यात येणार आहे. लोकमत सखी मंच, लोकमत युवा नेक्स्ट आणि लोकमत कॅम्पस क्लबच्या सदस्यांना ओळखपत्रावर प्रत्येकी दोन प्रवेशिका लोकमत सखी मंच कार्यालय, लोकमत भवन, रामदासपेठ येथे आज, १९ मार्चपासून दुपारी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत देण्यात येतील. लोकमतच्या वाचकांनाही बातमीचे कात्रण किंवा जाहिरातीचे कात्रण आणल्यास नि:शुल्क प्रवेशपत्र देण्यात येणार आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय, नागपूर येथे दूरध्वनी क्रमांक २४२९३५५ वर संपर्क साधावा.