शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

पाकविरोधात कारवाईसाठी संघाचा केंद्रावर दबाव

By admin | Updated: September 21, 2016 06:45 IST

जम्मू-काश्मीरच्या उरी येथील लष्करी मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली

योगेश पांडे,

नागपूर- जम्मू-काश्मीरच्या उरी येथील लष्करी मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आता ठोस पावले उचलावी, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील इतर संस्थांकडून केंद्रावर दबाव निर्माण करण्यात येत आहे.या भ्याड हल्ल्यामागे असलेले दहशतवादी, त्यांचे ‘मास्टरमार्इंड्स’ आणि त्याना सहकार्य करणाऱ्यांविरोधात कारवाई अपेक्षित आहे, अशी भूमिका संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकातून मांडली आहे. संघापाठोपाठच विश्व हिंदू परिषदेनेदेखील सविस्तर पत्रक जारी करुन केंद्र शासनाने पाकिस्तानसोबत कुठलीही चर्चा करण्यात येऊ नये, असा पवित्रा घेतला आहे. जर पाकिस्तान आपल्याला जखमा देत असेल तर भारतातून पाकिस्तानकडे जे पाणी जाते ते अडविण्यात यावे. तसेच पाकिस्तानसोबतचे सर्व व्यापार बंद करावे, अशी मागणी विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केली आहे. >आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील कोंडी करापाकवर एकाच वेळी अनेक प्रकारच्या कारवाया केंद्राकडून झाल्या पाहिजेत. लष्कर जे करेल ते करेलच, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील पाकिस्तानची कोंडी होईल, या पद्धतीने पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत संघाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर व्यक्त केले.>पाकिस्तान समर्थक विचार मांडणाऱ्यांवर कारवाई हवीअनेकदा पाकिस्तानचे समर्थन करणारे विचार सोशल मीडियातून मांडण्यात येतात. यासंदर्भात ठोस कारवाई करण्यासाठी केंद्राने राज्य शासनाला दिशानिर्देश द्यावेत, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली आहे.