शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘विदर्भ प्रदेश काँग्रेस’च्या स्थापनेसाठी दबावगट!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 04:24 IST

विदर्भातील नाराज काँग्रेस नेत्यांनी एकत्र येत एक दबावगट तयार करून हायकमांडकडे विदर्भ प्रदेश काँग्रेसची स्थापना करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता प्रदेश काँग्रेसमध्ये उघड दोन गट पडल्याचे चित्र समोर आले आहे.

नागपूर : विदर्भातील नाराज काँग्रेस नेत्यांनी एकत्र येत एक दबावगट तयार करून हायकमांडकडे विदर्भ प्रदेश काँग्रेसची स्थापना करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता प्रदेश काँग्रेसमध्ये उघड दोन गट पडल्याचे चित्र समोर आले आहे.विदर्भातील या नेत्यांची शुक्रवारी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या नागपुरातील बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे जन्मशताब्दी वर्ष विदर्भभर साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा शुभारंभ यवतमाळ येथून करण्यात येणार असून विदर्भातील कुठल्याही एका कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्लीत जाऊन निमंत्रण देण्याचाही निर्णय घेण्यात आला. सोबतच हे निमित्त साधत प्रदेश काँग्रेस व विलास मुत्तेमवार यांच्यावर नेम साधण्याचा मुख्य अजेंडा घेऊन रणनीती आखण्यात आल्याचे समजते.या बैठकीत चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, डॉ. नितीन राऊत, अनीस अहमद, माजी आमदार अशोक धवड, प्रदेश सचिव नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, नितीन कुंभलकर, कृष्ण कुमार पांडे, नरू जिचकार आदी उपस्थित होते.या नेत्यांनी अहमद पटेल हे राज्यसभेवर विजयी झाल्यानंतर दिल्ली येथे जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश व प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत त्यांना हटविण्याची मागणी केली होती.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस