शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

एकाच विद्यार्थ्याचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार

By admin | Updated: September 14, 2015 03:15 IST

१५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १३ व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

नागपूर : १५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १३ व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘बी.टेक.चा विद्यार्थी प्रेम रमेश औटी हा सर विश्वेश्वरय्या पदकाचा मानकरी ठरला असून, केवळ त्याचाच राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार होणार आहे. ‘व्हीएनआयटी’च्या १३ व्या दीक्षांत समारंभाबाबत संचालक डॉ. नरेंद्र चौधरी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यंदा परंपरेला फाटा देत केवळ ३६ गुणवंतांचा विविध पारितोषिकांनी मंचावर सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ.चौधरी यांनी दिली. निवडक लोकांनाच सभागृहाच्या आत प्रवेश राहणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे ‘पास’ तयार करण्यात आले आहे. सभागृहाच्या आत छायाचित्रण करण्यास मनाई करण्यात आली असून, कॅमेरा तसेच मोबाईल आणण्यासदेखील बंदी आहे. १४ सप्टेंबर रोजी व्हीएनआयटी सभागृहात दीक्षांत समारंभाची रंगीत तालीम घेण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना यासाठी बोलविण्यात आले आहे. व्हीएनआयटीच्या संकेतस्थळावर या समारंभाचे ‘वेबकास्टिंग’ करण्यात येणार असून, यामुळे सहजपणे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.११४० विद्यार्थ्यांना मिळणार पदवीदीक्षांत समारंभात एकूण ११४० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यात पीएचडीचे ४८, एमटेकचे ३१२, एमएस्सीच्या ४५ तर बीटेक व बीआर्कच्या ७२९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यंदा ‘एक्सेव्हेशन इंजिनिअरिंग’मधील ’एमटेक’ पदवीदेखील देण्यात येणार आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून अव्वल आलेली पूजा भोपळे व इतर मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम आलेला स्वप्नील पिंपळकर यांचादेखील सन्मान होणार आहे. कार्यक्रमाला ९५० विद्यार्थी उपस्थित राहतील व आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात जास्त उपस्थिती असेल, हे विशेष.