शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पावसाळी अधिवेशनाची तयारी जोरात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 11:56 IST

हिवाळी अधिवेशनानंतर यंदा उपराजधानीत ४ जुलैपासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. या अधिवेशनाच्या अनुषंगाने तयारी जोरात सुरू आहे.

ठळक मुद्देदुरुस्ती व साफसफाई, सौंदर्यीकरणाच्या कामाला गतीकाही कर्मचारी दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: हिवाळी अधिवेशनानंतर यंदा उपराजधानीत ४ जुलैपासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. या अधिवेशनाच्या अनुषंगाने तयारी जोरात सुरू आहे. विधानभवन, रविभवन, नागभवन, राजभवन आदी परिसरात साफसफाई, स्वच्छता, सौंदर्यीकरणासह दुरुस्तीच्या कामाला गती आली आहे. सध्या विधानभवन परिसरात डागडुजी सुरू असून थोडीफार रंगरंगोटीही केली जात आहे. परिसरातील खड्डे बुजवणे, डांबरीकरण करणे आदी कामाला गती आली आहे. जूनच्या अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करावयाची आहेत.

विधिमंडळ परिसरात ‘रेनप्रूफ ’ व्यवस्थाहवामान विभागानुसार जुलैमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसामुळे गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण परिसरात रेनप्रूफ व्यवस्था करण्याचे निर्देश विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी दिले आहेत. त्यानुसार व्यवस्था केली जात आहे. अधिवेशनकाळात बंदोबस्तातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना रस्त्यावरच तळ ठोकावा लागतो अशात त्यांना पावसाचा फटका बसू शकतो. ही बाब लक्षात घेता ठिकठिकाणी उभारण्यात येणारे टेंट यंदा ‘रेनप्रूफ’ राहणार आहे. याशिवाय पावसापासून बचावासाठी विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते इमारतीपर्यंत शेड उभारण्यात येणार आहे.

विधिमंडळ सचिवालय २२ पासून नागपुरात४ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असले तरी विधिमंडळ सचिवालय मात्र अगोदरच दाखल होत असते. त्यानुसार मुंबईल विधिमंडळ सचिवालय २२ जूनपासून नागपुरात हलविण्यात येणार आहे. परंतु मुंबई मंत्रालयातील काही कर्मचारी मात्र नागपुरात दाखल झाले आहेत. उर्वरित कर्मचारी टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत.

बंदोबस्तासाठी ६२०० पोलीसअधिवेशन काळात बंदोबस्तासाठी राज्यभरातील ६२०० पोलीस अधिकारी-कर्मचारी शहरात दाखल होणार आहेत. या पोलिसांच्या निवासस्थानाची व्यवस्था मंगल कार्यालये, सरपंच भवन आदी ठिकाणी करण्यात येणार आहे. याशिवाय मुंबई मुख्यालयातून शहरात येणाऱ्या शेकडो अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेतर्फे अतिरिक्त बोगीची व्यवस्था करण्यात येणार आहे.

टॅग्स :Governmentसरकार