शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

हैवानी याकूबच्या मनाची फाशीसाठी तयारी

By admin | Updated: July 23, 2015 02:53 IST

२०१३ साली सर्वोच्च न्यायालयाने मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर तो प्रचंड अस्वस्थ झाला होता.

मौत कब आएगी? : पश्चात्ताप नाही, अस्वस्थता मात्र कायम लोकमत विशेषयोगेश पांडे नागपूर२०१३ साली सर्वोच्च न्यायालयाने मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर तो प्रचंड अस्वस्थ झाला होता. ‘मौत कब आएगी और कितनी दर्दनाक होगी?’ हा प्रश्न तो सातत्याने विचारत होता. नंतर मात्र आपल्या दुष्कृत्याचे समर्थन करणारी मानसिकता तो बनवत गेला. सध्याच्या घडीला याकूब शांत असून फाशीवर चढायला काही दिवस शिल्लक राहिले असतानादेखील त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप नाही.२२ वर्षांअगोदर झालेल्या बॉम्बस्फोटांसाठी करण्यात आलेल्या ‘ब्रेनवॉशिंग’चे परिणाम अद्यापही कायम असून त्याला पश्चाताप झाला ही बाब कपोलकल्पित आहे. याकूबने हे हैवानी कृत्य रागाच्या भरात किंवा विकृत मानसिकतेतून केले नव्हते. होणाऱ्या परिणामांची त्याला जाणीव होती असे त्याच्यावर अनेक वर्षे मानसिक उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांनी नाव न घेण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले आहे.२००७ साली नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. परंतु मुंबईच्या ‘आॅर्थर रोड’ तुरुंगात असतानापासूनच त्याचे मानसिक संतुलन ढासळले होते. त्यानंतर त्याच्यावर जे.जे.इस्पितळात उपचारदेखील झाले होते. नागपुरात आल्यानंतर त्याला मानसिक आजाराचा फारसा त्रास झाला नाही. परंतु तुरुंगातील मानसोपचार तज्ज्ञ नियमितपणे त्याची भेट घ्यायचे. तुरुंगात एरवी शांत व फारसा कोणाशी न बोलणारा याकूब मानसोपचार तज्ज्ञांजवळ आपले मन मोकळे करायचा. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवल्यानंतर तो संतापला होता. माझे मरण नेमके कधी येईल व शिक्षा कुठे होईल याबाबतीत विचारणा करायचा. परंतु नंतर तो स्वत:च मरणाची काय भीती बाळगायची, ‘जो किया वह सोच कर ही किया’ असे म्हणायला लागला.आतादेखील याकूबला मोठा मानसिक आजार नाही. एक काळ होता की त्याच्याकडे इतर सहकाऱ्यांना भाषा शिकविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु आता तो अंडा सेलमध्ये असून त्याला इतर कैद्यांशी भेटू दिले जात नाही. ‘आॅर्थर रोड’ जेलमधील सुरुवातीच्या दिवसांमध्येदेखील अशीच स्थिती होती. त्यामुळे त्याला एकटेपणामुळे मानसिक नैराश्य आले आहे. परंतु त्याला केलेल्या कृत्याचा कुठलाही पश्चाताप नाही. मरणाला तो तयार आहे असे संबंधित मानसोपचार तज्ज्ञांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.रात्री झोप येण्यासाठी गोळ््यायाकूब मेमनला मुंबईपासूनच रात्री झोप न येण्याचा त्रास आहे. एकटेपणातून आलेल्या मानसिक नैराश्यामुळे त्याला रात्री झोप लागायची नाही. अनेकदा तर झोपेच्या गोळ््या घेणे भाग पडले. आजही या स्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. पश्चाताप नव्हे, दिसतो तो संतापगुन्हेगाराला फाशीवर नेत असताना त्याला पश्चाताप होतो व तो विनवण्या करतो असा एक सर्वसाधारण समज आहे. परंतु गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास केला असता यात फारसे तथ्य नसल्याचे दिसून येते. अनेकदा फाशीच्या वेळी उपस्थित असणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांनुसार, फाशीच्या वेळी संबंधित गुन्हेगाराच्या मनात पश्चाताप नव्हे तर भीती असते. या भीतीमधून निघणारा संताप व्यवस्थेवर व उपस्थित व्यक्तींवर निघतो. आकांडतांडव करणे, पाय झाडणे, शिव्या देणे असे प्रकार त्यांच्याकडून करण्यात येतात. वरून शांत वाटणारे गुन्हेगारदेखील अशाच पद्धतीने प्रतिक्रिया देतात असे मत गुन्हेगारी मानसशास्त्राचे अभ्यासक डॉ.विजय शिंगणापुरे यांनी दिले.