शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवतींनो हिरड्यांचे आजार सांभाळा, कमी वजनाचे बाळ जन्माची शक्यता: डॉ तुषार श्रीराव

By सुमेध वाघमार | Updated: February 23, 2024 20:19 IST

शासकीय दंत महाविद्यालयात राष्ट्रीय पेरियोडॉन्टिस्ट दिन.

सुमेध वाघमारे, नागपूर : किशोरवयीन मुली आणि गर्भवतींमधील दातांचा आजारांकडे दुर्लक्ष करू नये. लक्षणे दिसताच उपचार घ्या. जर गर्भवतींना हिरड्यांचे आजार असतील तर त्यांच्या पोटी कमी वजनाचे बाळ जन्माला येते, असे एका अभ्यासातून पुढे आले आहे, अशी माहिती इंडियन सोसायटी आॅफ पेरियोडॉन्टोलॉजी मुख्यालयाचे उपाध्यक्ष डॉ. तुषार श्रीराव यांनी येथे दिली.

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचा पेरियोडॉन्टोलॉजी विभागातर्फे शुक्रवारी राष्ट्रीय पेरियोडॉन्टिस्ट दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून वरिष्ठ पेरियोडॉन्टिस्ट डॉ. आर. एम. कोहाड, डॉ. आर. के. येल्टीवार यांच्यासह कार्यकारी अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक उपिस्थत होते.

किशोरवयीन मुली आणि गर्भवती महिलांच्या मुख आरोग्याची तपासणी व उपचार करणे ही अलिकडच्या काळाची गरज असल्याचे आवाहनही डॉ. श्रीराव यांनी केले. या दिनाच्यानिमित्ताने सेल्फी विथ स्माईल स्पर्धा, स्लोगन स्पर्धा, रील मेकिंग स्पर्धा, मोबाईल छायाचित्रण स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि पेशंट टेस्टोमोनियल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. फडनाईक यांनी दिली.

यावेळी पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. डॉ. कल्पक पीटर हे क्विझमास्टर होते. डॉ मानसी जोशी यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे संचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. वैभव कारेमोरे, डॉ.विवेक ठोंबरे यांनी परिश्रम घेतले. संचालन डॉ. पायल व डॉ. दीपक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. श्रीया, अपूर्वा, विवेक, आयुषी, सेजल, याकांग, हरिलाल यांनी परिश्रम घेतले. आभार डॉ.विवेक ठोंबरे यांनी मानले.

टॅग्स :doctorडॉक्टर