शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘कस्टडी डेथ’मुळे एपीआयचे किस्सेही चर्चेत

By admin | Updated: June 6, 2016 03:03 IST

चोरीच्या आरोपात पकडण्यात आलेल्या आरोपीने आत्महत्या केल्यामुळे (कस्टडी डेथ) सीताबर्डी पोलीस ठाणे पुन्हा एकदा

नरेश डोंगरे ल्ल नागपूरचोरीच्या आरोपात पकडण्यात आलेल्या आरोपीने आत्महत्या केल्यामुळे (कस्टडी डेथ) सीताबर्डी पोलीस ठाणे पुन्हा एकदा सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे. सोबतच वरिष्ठांच्या नावाखाली सीताबर्डीसह या झोनमधील पाच पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपल्या बोटावर नाचवणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचेही किस्से रविवारी सकाळपासूनच पोलीस दलात चर्चेला आले आहे. १० वर्षांपूर्वी मालखान्यातील चांदी चोरीच्या प्रकरणाने सीताबर्डी पोलीस ठाण्याला चर्चेच्या प्रकाशझोतात आणले होते. त्यानंतर पाच वर्षांपूर्वी वसंतराव नाईक झोपडपट्टीत झालेल्या हत्याकांडाने सीताबर्डी ठाण्याचा कारभार चर्चेला आला. तोडीबाज नेटवर्क या अधिकाऱ्याचे प्रशस्त तोडीबाज नेटवर्क आहे. देहविक्रय करवून घेणारे लॉजमालक आणि दलाल तसेच तोडीबाज दलालही चर्चेचा विषय आहे. परंतु, त्याची थेट तक्रार करण्याची हिंमत कुणी दाखवू शकले नाही. एका प्रकरणात मध्यंतरी त्याने हस्तक्षेप करून दलालाच्या माध्यमातून फिर्यादीला रात्री उशिरा आपल्या निवासस्थानी बोलवून घेतल्याचीही चर्चा झाली होती. कमालीचा चाणाक्ष अन् गोडबोल्या असलेला हा अधिकारी स्वत:वर बालंट येऊ देत नाही. गुन्हेशाखेने शनिवारी मोबाईल विक्रेत्यांवर सीबीआय स्टाईल दणकेबाज कारवाई केली. त्या मोबाईल विक्रेत्यांना या एपीआयचेच अभय होते. महिन्याला मोठी देण मिळत असल्याने तोच ‘साहेबांचे‘ नाव पुढे करून कारवाई थांबवत होता. त्याचमुळे बनावट अ‍ॅसेसरीज तसेच बनावट लोगो वापरून ग्राहकांची लुबाडणूक करणाऱ्या मोबाईल विक्रेत्यांवर सीताबर्डी पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत होते, या आरोपाला मोबाईल विकेत्यांवरील दणकेबाज कारवाईमुळे दुजोरा मिळाला आहे. उपायुक्तांपेक्षाही जास्त दरारा४केवळ मोबाईलच्याच नव्हे तर अनेक प्रकरणात तो थेट हस्तक्षेप करून पोलीस निरीक्षक , सहायक निरीक्षक किंवा उपनिरीक्षकांची कोंडी करतो,अशी ओरड आहे. त्याचा दरारा पोलीस उपायुक्तांपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे संबंधित परिमंडळात येणाऱ्या अनेक ठाण्यातील हवालदार, शिपाई तर साहेबांपेक्षा या एपीआयच्याच सेवेत राहणे पसंत करतात. अवैध हुक्का पार्लर, लॉज, हॉटेल, गार्डन रेस्टॉरंटचे मालक झोन साहेबांपेक्षा याच अधिकाऱ्याला अर्थपूर्ण ‘दुवा-सलाम‘ करतात, त्याचीही उघड चर्चा आहे. वरिष्ठांच्या लक्षात हा प्रकार आला कसा नाही, त्याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.