विदर्भ प्रेअर फेस्टिव्हल : प्रार्थना टॉवर समर्पितनागपूर : कस्तुरचंद पार्कवर आयोजित विदर्भ प्रेअर फेस्टिव्हलमध्ये लोकांची प्रचंड गर्दी होती. पहिल्या दिवशी डॉ. पॉल दिनाकरन यांच्यासह आमदार सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, बिशॉप पॉल दुपारे, बिशॉप ई. पांचू, रेव्ह. एन.वाय थोरात, बिशॉप डी.टी. वॉर्ड, डी.जे. न्यूटॉन उपस्थित होते. डॉ. पॉल दिनाकरन यांनी मंचावर आ. सुधाकर देशमुख आणि आ. डॉ. मिलिंद माने यांच्यासह सर्व पाद्रींनी विदर्भात शांतता नांदावी, प्रगती आणि कृपा व्हावी, यासाठी प्रार्थना केली. १ आॅक्टोबरला डॉ. पॉल यांनी पाटणी कॉम्प्लेक्स, कामठी रोड येथील येथू कॉल्स प्रार्थना टॉवर समर्पित केले. हे प्रार्थना टॉवर दररोज सकाळी ८ ते रात्री ८ या वेळात सर्व लोकांसाठी खुले राहील. (वा. प्र.)
विदर्भाच्या प्रगतीसाठी प्रार्थना
By admin | Updated: October 5, 2015 03:04 IST