शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या प्रतापनगर पोलीस ठाण्यातून महिला आरोपी पळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 19:47 IST

चोरीच्या आरोपात पोलिसांनी ताब्यात घेतलेली शीलाबाई मदनलाल कुंभार (वय ६०) नामक आरोपी महिला गुरुवारी सकाळी पोलीस ठाण्यातून पळून गेली. यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपोलीस दलात खळबळ : गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चोरीच्या आरोपात पोलिसांनी ताब्यात घेतलेली शीलाबाई मदनलाल कुंभार (वय ६०) नामक आरोपी महिला गुरुवारी सकाळी पोलीस ठाण्यातून पळून गेली. यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.मूळची तिरुपती बालाजी येथील रहिवासी असलेली शीलाबाई हिला बुधवारी सायंकाळी बजाजनगर पोलिसांनी चोरीच्या आरोपावरून ताब्यात घेतले होते. गुन्हा प्रतापनगर ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तिला प्रतापनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. प्रतापनगर ठाण्यात महिला कोठडी (लेडीज लॉकअप) नसल्याने पोलिसांनी तिला रात्रभर ठाण्यात बसवून ठेवले. दरम्यान, पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान पोलिसांचा डोळा लागल्याचे लक्षात येताच शीलाबाईने ठाण्यातून पळ काढला. काही वेळेनंतर हा प्रकार लक्षात येताच सर्वत्र खळबळ निर्माण झाली. नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहरातील सर्व पोलीस ठाण्यात या संबंधीची माहिती देण्यात आली. शीलाबाईचे वर्णन कळविण्यात आले. तिला पकडण्यासाठी पोलिसांनी शहरभर धावपळ चालवली. मात्र, दुपारी २ वाजेपर्यंत तिचा पत्ता लागला नव्हता.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेWomenमहिला