शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांची शाळेवर सावध भूमिका !

By admin | Updated: July 18, 2015 02:51 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना केंद्र्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा दिली जाणार आहे.

सरसंघचालकांच्या सुरक्षेचा मुद्दा : विरोधकांची चर्चेची तयारीनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना केंद्र्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा दिली जाणार आहे. सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफ विभागाकडे राहणार आहे. या जवानांच्या निवासासाठी उंटखाना येथील महापालिके च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळा व ज्युनियर कॉलेजची इमारत उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे. यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने तयारी केली आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजपने सावध भूमिका घेतली आहे. २०जुलैच्या सभेत हा मुद्दा गाजण्याचे संकेत आहेत.शु्रक्रवारी सत्तापक्ष व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या वेगवेगळ्या बैठकी झाल्या. या मुद्यावर चर्चा करण्याचा निर्णय काँगे्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. काँगे्रेससोबतच विरोधी सदस्यांचाही या प्रस्तावाला विरोध आहे. या मुद्याला लोकांचा पाठिंबा मिळविण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे यावरून वाद न वाढविता सावध भूमिका घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.शाळा व कॉलेजची जागा वार्षिक ४,७२,९१५ रुपये भाडे तत्त्वावर उपलब्ध करण्याचा प्रस्ताव असला तरी या प्रस्तावाला विरोध झाल्यास रेशीमबाग येथील बंद पडलेली शाळा भाड्याने देण्याचा प्रस्ताव पुढे येण्याची शक्यता आहे. शाळेच्या मुद्यावर कोणत्याही पक्षाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मागील ११ व या सभेतील २० असे ३१ प्रश्न कामकाजात समाविष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)