नागपूर : वीज यंत्रणेच्या नियमित देखभाल आणि दुरुस्तीसाठी येत्या २६ मे रोजी शहरातील इतवारी, वर्धमाननगर आणि बिनाकी परिसर या भागातील वीज पुरवठा बंद राहणार आहे, असे महावितरणच्या वतीने कळविण्यात आले आहे.
सकाळी ८ वाजतापासून सकाळी १२ वाजेपर्यंत : चित्रशालानगर, लक्ष्मीनगर, वांजरा ले-आऊट, कळमना नाका क्रमांक ४, अन्सारनगर, डोबीनगर, भानखेडा, टिमकी, दादरा पूल, टोप्रा विहीर आणि जवळपासचा परिसर. सकाळी ८ वाजतापासून सकाळी १० वाजेपर्यंत : एव्हीपी ले-आऊट, छापरूनगर, काचीविसा. सकाळी ९ वाजतापासून दुपारी २ वाजेपर्यंत : होलसेल मार्केट, तीन नल चौक, पोलीस क्वाॅर्टर या भागातील वीज पुरवठा बंद राहणार आहे. ग्राहकांनी या काळात महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.