संघर्षातून मिळविले ९४ टक्के नागपूर‘प्लंबिंग’चे काम करतात. घरच्या स्थितीची पूर्ण जाणीव असलेल्या आकाशचे सातवीपर्यंतचे शिक्षण महानगरपालिका शाळेतच झाले. दहावीच्या परीक्षेत त्याला ९४ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. परंतु त्यानंतर घराला थोडा हातभार लागावा म्हणून त्याने त्या काळात एका कपड्याच्या दुकानात काही दिवस कामदेखील केले. ९४ टक्के गुण घेऊन दहावीत उत्तीर्ण झाल्यानंतर त्याच्यासमोर आव्हान होते ते पुढील शिक्षणासाठी लागणार्या शुल्काची तजवीज करण्याचे. समोर मार्ग दिसत नव्हता. परंतु त्याच्या यशामुळे समाजातील दातृत्वाचा चेहरा समोर आला अन् त्याचे बारावीचे शुल्क भरण्यासोबतच शिकवणी वर्गाचीदेखील व्यवस्था झाली. त्यानेदेखील एकही क्षण न दवडता केवळ अभ्यासाचाच ध्यास घेतला. ‘टायफॉईड’ झाला असतानादेखील त्याचा आत्मविश्वास ढळला नाही अन् सर्व अडचणींवर मात करीत त्याने ९३.८५ टक्के गुण मिळवीत सर्वांंचा विश्वास सार्थ ठरविला. ‘इच्छा तेथे मार्ग’ हे वाक्य बारावीच्या परीक्षेत सर्व खडतर परिस्थितीवर मात करीत स्वकर्तृत्वाने यश संपादन करणार्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी आकाश ढगेबद्दल हे वाक्य तंतोतंत खरे आहे. ‘ दोन वर्षांपूर्वी खडतर परिस्थितीचा सामना करून देदीप्यमान यश मिळविणार्या आकाशचा संघर्ष योगेश पांडे शिवनगर येथे राहणार्या ढगे कुटुंबाची आर्थिक अवस्था तशी बेताचीच. आकाशने लहानपणापासून दारिद्रय़ाचे चटके सहन केले. वडील रामदास ढगे हे दिवस-रात्र झटून अगदी परीक्षेच्या काळात
आकाशची गगनभरारी हवे मदतीचे बळ
By admin | Updated: June 3, 2014 03:08 IST