शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

दारिद्र्य निर्मूलन दिन विशेष; नागपुरात १२ लाखांवर लोक दारिद्र्यरेषेखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 10:40 IST

नागपुरात तब्बल २ लाख ४० हजार ६२२ कुटुंबातील १२ लाख ४७ हजार ५३ लोक दारिद्र्यरेषेखाली असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्दे२ लाख ४० हजार कुटुंबांचा समावेश १,३१,९०५ बीपीएल, तर १,०८,६१७ अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुुुंब

आनंद डेकाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकार कुठल्याही पक्षाचे असो गरिबी दूर करण्याचा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा दावा नेहमीच केला जातो. परंतु हा दावा कितीही केला जात असला तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. एकट्या नागपुरात तब्बल २ लाख ४० हजार ६२२ कुटुंबातील १२ लाख ४७ हजार ५३ लोक दारिद्र्यरेषेखाली असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.नागपूर शहर व ग्रामीण भागातील शिधापत्रिकेचा विचार केला असता अतिशय भयावह चित्र समोर येते. सर्वधारणपणे बीपीएल म्हणजे दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती अशी समज आहे. परंतु शिधापत्रिकेचा विचार केला तर बीपीएलपेक्षाही खाली असलेली व्यक्ती म्हणजे अंत्योदय शिधापत्रिकाधारक होय. नागपुरात एकूण २ लाख ४० हजार अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिकाधारक कुटुंब आहेत. त्यांची एकूण सदस्य संख्या ही १२ लाख ४७ हजार ५३ इतकी आहे. नागपूर शहरात ३९,२०५ इतके अंत्योदय शिधापत्रिकाधारक तर ६१,८०५ बीपीएल कार्डधारक आहेत. त्यांची या कुटुंबातील एकूण सदस्य संख्या ५ लाख ४८ हजार २५४ इतकी आहे. तर ग्रामीण भागात ६९,४१२ अंत्योदय व ७०,१५३ बीपीएल कार्डधारक आहेत. त्यांच्या कुटुंबातील एकूण सदस्य संख्या ६,९८,७९ इतकी आहे.सरकारतर्फे रेशन दुकानातून अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना गहू व तांदूळ माफक दरात उपलब्ध करून दिले जाते. २०१४ पासून अन्न सुरक्षा योजना अंमलात आली. या योजनेनुसार एपीएल कार्डधारकांपैकी काही कुटुंबांनासुद्धा अन्नधान्य पुरवठा सुविधेचा लाभ दिला जातो. त्याला एपीएल प्राधान्यगट असे म्हटले जाते. नागपुरात तब्बल ३ लाख ५६ हजार ९२३ एपीएल कार्डधारकांना अन्नधान्य पुरवठ्याचा लाभ दिला जातो. अशा कार्डधारक कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या १६ लाख ९० हजार ६४१ इतकी आहे.

रेशनकार्ड नसणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावरअंत्योदय व बीपीएल रेशन कार्डधारकांची ही संख्या अधिकृतरीत्या आहे. परंतु नागपुरात रेशन कार्ड नसणाºया कुटुंबांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या यापेक्षाही अधिक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Governmentसरकार