शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

स्थायी समितीत गाजणार खड्डे

By admin | Updated: February 5, 2015 01:13 IST

विकासाच्या नावाखाली शहरातील रस्त्यांवर सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त असतानाच केबल टाकण्यासाठी खड्डे खोदले जात आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

विरोधकांचा आंदोलनाचा इशारा : ४ जी चे खड्डे धोकादायकनागपूर : विकासाच्या नावाखाली शहरातील रस्त्यांवर सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त असतानाच केबल टाकण्यासाठी खड्डे खोदले जात आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या संदर्भात सदस्यासोबतच नागरिकांच्या तक्रारी असल्याने हा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत गाजण्याचे संकेत समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी बुधवारी दिले. दरम्यान विरोधी पक्षाने याच मुद्यावरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. बोरकर यांच्या प्रभागात केबल टाकण्यासाठी मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अपघातही वाढलेले आहेत. आधीच दुरुस्तीसाठी निधी नाही. त्यातच खोदकामामुळे रस्ते पुन्हा नादुरुस्त होत असल्याचे चित्र आहे . हा प्रश्न स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करून आयुक्तांना निर्देश देणार असल्याचे बोरकर म्हणाले..नियम धाब्यावर बसवून रहदारीच्या रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी तत्कालीन आयुक्त श्याम वर्धने यांच्या निदर्शनास ही बाब आणली होती. झिंगाबाई टाकळी व आजूबाजूच्या परिसरातील काम बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. परंतु अद्याप हे काम सुरू असल्याची माहिती विरोधीपक्ष नेते विकास ठाकरे यांनी दिली. खासगी कंपन्यांना काम दिले जाते. परंतु मनपाचे त्यावर नियंत्रण राहात नाही. ४ जी केबल टाकण्यासाठी शहरात ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे. यावर मनपा अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. ही बाब आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निदर्शनास आणू. त्यानंतरही प्रश्न सुटला नाही तर आंदोलन करू , असा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)रात्रीला खोदकाम केबल टाकण्याला होत असलेला नागरिकांचा विरोध विचारात घेता रात्रीच्या सुमारास खोदकाम केले जाते. या संदर्भात लक्ष्मीनगर झोनचे सभापती गोपाल बोहरे यांनी आयुक्तांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत.आयुक्त बैठकीत व्यस्तया संदर्भात एक नगरसेवक आयुक्तांना भेटण्यासाठी आले असता त्यांना आयुक्त बैठकीत व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. आयुक्तांशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता भेटीचे कारण विचारण्यात आले. नंतर प्रतिसाद मिळाला नाही.