जिल्हा व राज्य कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी ३१ मेपर्यंत सार्वत्रिक बदल्या होतात. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी २० टक्के बदल्या करण्यात येतात. यापैकी १० टक्के प्रशासकीय व १० टक्के बदल्यांचा समावेश विनंती बदली म्हणून होते. कोरोनामुळे गेल्यावर्षीपासून कर्मचाऱ्यांच्या बदलींची प्रक्रिया उशिरा होत आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे ३१ जुलैपर्यंत बदलीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. यावेळी राज्य सरकारनेच जिल्हा परिषद व कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला ३० जूनपर्यंत स्थगिती दिली आहे; परंतु तीन कारणांसाठी यात कर्मचाऱ्यांना शिथिलता दिली जाणार आहे. ज्यात सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे भरणे, शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार प्राप्त झाल्यास त्यांची बदली होऊ शकते.
सार्वत्रिक बदल्यांना ३० जूनपर्यंत स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:07 IST