‘एनएसडीएल’तर्फे आयोजन : जनजागृती कार्यक्रमनागपूर : राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या (एनपीएस) माध्यमातून सरकारी, खासगी आणि व्यावसायिकांना सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदात घालविता येते आणि आर्थिक गरजासुद्धा पूर्ण करता येतात. ही योजना आर्थिक फायद्याचा सर्वोत्तम पर्याय असून त्याचा फायदा लोकांनी युवावस्थेपासूनच घ्यावा, असे आवाहन ‘एनएसडीएल’चे सहायक व्यवस्थापक भवानी सिंग यांनी येथे केले.एनएसडीएल ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या वतीने ‘एनपीएस’ची माहिती देण्यासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सदर येथील एका हॉटेलमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले. यावेळी ‘एनएसडीएल’चे सहायक उपाध्यक्ष मंदार कार्लेकर प्रामुख्याने उपस्थित होते. भवानी सिंग म्हणाले, टिअर-१ आणि टिअर-२ योजनेशी जुळता येईल. ६० वर्षांनंतर पेन्शन मिळेल. एन्यूटीच्या स्वरुपात ४० टक्के आणि एकमुश्त ६० टक्के रक्कम मिळणार आहे. आज देशात १ कोटी एनपीएस खाताधारक आहेत. त्यांची एक लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम योजनेत जमा आहे. योजनेवर पेन्शन फंड नियंत्रण विकास प्राधिकरणाची नजर असते. एकत्रित फंडाची गुंतवणूक एनपीएस ट्रस्टच्या माध्यमातून होते. गुंतवणूकदारांना तक्रार आणि निवारणाची व्यवस्था आहे. ‘एनपीएस’शी जुळल्याने विशेष लाभ आणि जास्तीत जास्त परतावा मिळतो. यासह शुल्कही कमी लागते. प्रारंभी कार्लेकर यांनी योजनेची आणि भारत सरकारच्या २००४ पासून जारी असलेल्या राष्ट्रीय पेन्शन योजनेद्वारे होणाऱ्या आर्थिक फायद्याची माहिती दिली. कार्लेकर म्हणाले, २००४ मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना अनिवार्य केली आहे. त्यानंतर २७ राज्यातील सरकारने या योजनेचा अवलंब केला. शासकीय नोकरीत नसलेल्यांना स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन आॅफ इंडिया या ‘पार्इंट्स आॅफ प्रेजेन्स’ (पीओपी) च्या माध्यमातून योजनेचा फायदा घेऊ शकतात. सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकासुद्धा पीओपीच्या स्वरूपात काम करीत आहेत. १८ ते ६० वयोगटातील व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात. यावेळी स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनच्या क्षेत्रीय व्यवस्थापक अर्चना जैन, शाखा व्यवस्थापक सोनल देशमुख, विपणन व्यवस्थापक रंजना घोडे, विपणन अधिकारी आशिष गंपावार आणि २०० पेक्षा जास्त गुंतवणूकदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सेवानिवृत्तीनंतरचे जीवन ‘एनपीएस’ने सुलभ
By admin | Updated: October 11, 2015 03:04 IST