शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीतील बदल अन्यायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 10:56 IST

केंद्र सरकारच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती सुधारित योजनेनुसार विद्यार्थ्याला खासगी संस्थेत प्रवेश घेताना शैक्षणिक शुल्क भरावे लागणार आहे.

ठळक मुद्देखासगी संस्थेचा फायदाविद्यार्थ्यांना भरावे लागणार शैक्षणिक शुल्क

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती सुधारित योजनेनुसार विद्यार्थ्याला खासगी संस्थेत प्रवेश घेताना शैक्षणिक शुल्क भरावे लागणार आहे. पूर्वी प्रवेश घेताना शैक्षणिक शुल्क भरण्याची गरज नव्हती. शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक संस्थेस देण्याची हमी शासनाने घेतली होती. आता खासगी इंजिनियरिंग, मेडिकल इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी पात्र अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेशाच्या वेळी शैक्षणिक शुल्क भरावे लागेल, तरच प्रवेश होईल, नंतर ही रक्कम शासनातर्फे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होईल. वरवर ही अतिशय चांगली योजना वाटत असली तरी ही विद्यार्थ्यांना अन्यायकारक ठरणारी आहे. यातून खासगी संस्थेला फायदा तर विद्यार्थ्यांच्या अडचणी मात्र वाढणार आहेत.केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने अनुसूचित जातींसाठीची पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेत एप्रिल २०१८ पासून सुधारणा केली आहे. सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रापासून या सुधारणा व मार्गदर्शक तत्त्वे लागू होणार आहेत. सुधारित योजनेत निर्वाह भत्ता वाढविण्यात आलेला नाही. पूर्वीचा आहे तोच ठेवला. मात्र दर दोन वर्षांनी महागाई निर्देशांक लक्षात घेऊन निर्वाह भत्ता वाढविण्याची जी तरतूद होती, ती काढून टाकण्यात आली. एवढेच नव्हे तर वार्षिक उत्पन्न मर्यादासुद्धा २.५ लक्ष ठेवण्यात आली. त्यात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपये आहे, असे विद्यार्थी व त्यांचे पालक लाख रुपये शैक्षणिक शुल्क प्रवेशाच्या वेळी कसे व कुठून भरणार? तसेच शैक्षणिक शुल्काची रक्कम सरकार लगेच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करेल याची शाश्वती नाही. कारण गेल्या काही वर्षांत निर्वाह भत्ता व शैक्षणिक शुल्क मिळण्यास खूप विलंब झाल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणी सहन कराव्या लागल्या.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न२०१० ची पद्धत योग्य व विद्यार्थ्यांच्या सोयीची असताना २०१८ मधील बदल हा शैक्षणिक संस्थांच्या फायद्यासाठी व विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढवणारा आहे. एकूणच अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणापासून वंचित राहावे, असेच या सुधारित योजनेचा हेतू दिसतो. ही पद्धत रद्द करून पूर्वीचीच पद्धत सुरू ठेवावी, अशी मागणी आम्ही केली असून यासंदर्भात पंतप्रधानांनाही निवेदन पाठविले आहे.- ई. झेड. खोब्रागडे, संविधान फाऊंडेशन.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र